15 December 2024 8:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

वृक्ष जंगलतोड व नद्यांचं प्रदूषण: शहरांचं जळणारं फुफ्फुस कोणासाठी 'प्राण' तर कोणासाठी 'फॅशन'

Save Aarey, Save Forest, Save Trees, Pollution

मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला वनस्पती तज्ज्ञांनीही अनुकूलता दाखविली. मात्र, यामध्ये आर्थिक व्यवहार झाला असून, कारशेड उभारणाऱ्या कंपनीने तीन तज्ज्ञांना एकूण दीड कोटी रुपये दिले असल्याचा गंभीर आरोप स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शुक्रवारी केला. नियमबाह्य पद्धतीने पालिका आयुक्तांनी हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर केल्याने, या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यामुळे मेट्रो कारशेडचे प्रकरण पुन्हा पेटले आहे.

वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत गुरुवारी भाजपने आपला महत्त्वाकांक्षी प्रस्ताव मंजूर करून घेतला. शिवसेनेचे संख्याबळ अधिक असताना झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला आठ मते मिळाली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या पाचपैकी तीन तज्ज्ञांनी समर्थन दिले. मात्र, समर्थन करणारे चंद्रकांत साळुंखे, सुभाष पाटणे आणि डॉ. शशीरेखा सुरेशकुमार या तज्ज्ञांना आयुक्तांनी दालनात बोलावून, पदावरून हटविण्याची धमकी दिली होती, असा आरोप यशवंत जाधव यांनी केला आहे.

मेट्रो हटाव, आरे बचाव, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, लढेंगे-जितेंगे अशा घोषणांनी शनिवारी सकाळी आरे कॉलनीचा परिसर दणाणून गेला. मेट्रो ३ प्रकल्पातील आरे कारशेडचा वाद चिघळला असून, २२३८ झाडांच्या कत्तलीविरोधात पर्यावरणप्रेमी आणि आदिवासी यांनी जनआंदोलन छेडले आहे. या जनआंदोलनाला शनिवारी आरे कॉलनी येथून सुरुवात झाली आहे. कारशेडच्या जागेबाहेर सकाळी मोठय़ा संख्येने आदिवासी-पर्यावरणप्रेमी जमले आणि त्यांनी एमएमआरसी, मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

८० हजार नागरिकांच्या हरकती सादर झाल्यानंतरही वृक्ष प्राधिकरणाने २२३८ झाडांच्या कत्तलीचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला असून, पर्यावरणप्रेमी-आदिवासी आक्रमक झाले आहेत. त्यातूनच शनिवारी सकाळी ९ आरेतील कारशेडच्या जागेच्या प्रवेशद्वाराजवळ शेकडो पर्यावरणप्रेमी-आदिवासी जमले. यात शालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वाचाच समावेश होता.

यावेळी पालिका, एमएमआरसीविरोधात जोरदार निदर्शने केली आणि कारशेडमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. कारशेडमध्ये झाडांची काय स्थिती आहे, एमएमआरसीने परस्पर झाडे कापली नाहीत ना, हे पाहण्याचा आंदोलकांचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना अडवल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यामुळे आंदोलकांनी तिथेच मानवी साखळी तयार करत निदर्शने केल्याची माहिती आंदोलक निशांत बंगेरा यांनी दिली आहे.

दरम्यान, आज स्वतः राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील अत्यंत साधे पणाने आरे कॉलनीतील आंदोलकांना भेटून आणि गंभीर विषयावर पाठिंबा दर्शवून आल्या. यावेळी त्यांनी मुंबईतील आरे कॉलनीतील झाडांचं आणि जंगलाचं महत्व देखील उपस्थितांना पटवून दिलं. त्यावेळी निर्दर्शन करणाऱ्या लोकांना देखील शर्मिला ठाकरे यांचा साधेपणा भावल्याचे पाहायला मिळाले. वर्षभरापूर्वी देखील त्यांनी मनसेतर्फे येथे मोठा मोर्चा काढून प्रशासनाला मुंबईचं फुफ्फुस असलेल्या आरे कॉलनीचं आणि त्यातील हजारो वृक्षांचं महत्व पटवून दिलं होतं. मात्र यावेळी देखील त्या स्वतः एका सामान्य जवाबदार नागरिकाप्रमाणे येथे आंदोलकांसोबत मिसळल्याचे पाहायला मिळले. विशेष म्हणजे यांचं आरे कॉलनी आणि संजय गांधी उद्यानातील जंगलाचं महत्व राज ठाकरे यांनी २०१४ मध्येच ब्लू-प्रिंट’मध्ये अधोरेखित केलं होतं. विशेष म्हणजे शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित लोकांशी संवाद साधला आणि लोकांनी तुम्ही हे हाणून पाडण्यासाठी शक्ती पणाला का लावत नाही असा प्रश्न उपस्थित केला तेव्हा, ‘माझा नवरा आरेतील जंगलाचं महत्व अनेक वर्षांपासून सांगत आले आहेत, मात्र लोकं त्यांना मतदानाचं करत नसल्याने आमच्या कडे कोणतीही राजकीय किंवा प्रशासकीय शक्ती नसते तेव्हा आम्ही देखील सरकारी पातळीवर काहीच करू शकत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये सादर केलेल्या ब्लू-प्रिंट मध्ये न्यूयॉर्क मधल्या मॅनहॅटन शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या सेंट्रल पार्कची केसस्टडी जनतेसमोर मांडली होती. एकूण ७७८ एकर इतकं मोठ क्षेत्रफळ त्या मॅनहॅटनमधील सेंट्रल पार्कच आहे. तर दुसरीकडे मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान १०४ चौरस किलो मीटर म्हणजे न्यूयॉर्क मधल्या सेंट्रल पार्क सारखी तब्बल ३० पार्क बसतील इतका मोठा नैसर्गिक वारसा मुंबईला लाभला आहे हे तेंव्हा कळलं. विशेष म्हणजे मॅनहॅटनमधील सेंट्रल पार्क हे तिथल्या लोकांना निसर्गात मोकळा श्वास घेता यावा म्हणून एकत्र येऊन उभाराव लागलं होत, परंतु मुंबईकरांना ते निसर्गानेच दान दिलं आहे याची साधी कल्पना सुद्धा मुंबईकरांना नाही, हेच दुःख अनेक पर्यावरण प्रेमी व्यक्त करतात.

परंतु राज ठाकरेंच्या ब्लू-प्रिंट सारखे शहर आणि गावांसाठी पोषक ठरणारे विषय दुर्लक्षित करून आणि ‘युतीच्या राजकीय झोंबाझोंबी’कडे आकर्षित होऊन, सामान्य मुंबईकर हा स्वतःच आणि स्वतःच्या पुढच्या पिढीचं आयुष्य कसं गुदमरेल याची तरतूद स्वतःच करत आहे असच काहीसं चित्र आहे. माझं शहर निसर्गाविना ‘मेलं’ तरी चालेल, पण मी ज्या पक्षाचा चाहता आहे, त्या पक्षाच्या नेत्याच काही ठोस कर्तृत्व नसेल तरी त्याचा ‘जय-जय-कार’ होणं अधिक महत्वाचं आहे हे तरुण पिढीला वाटण सुद्धा भविष्यात खूप घातक ठरू शकत. कारण त्यातूनच त्यांची शहराच्या निसर्गाप्रती असलेली उदासीनता लक्षात येते.

मेट्रो कारशेडमुळे आरेतील झाडांची मोठ्या प्रमाणत कत्तल होणार असून, गेल्या काही वर्षांपासून सेव्ह आरेच्या माध्यमातून विरोध होत आहे. मात्र तरी देखील झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नसल्याने आज पुन्हा एकदा मुंबईकर रस्त्यावर उतरले. तसेच सीएसटी स्टेशन व्यतिरिक्त मुंबईच्या विविध भागात मेट्रो प्रकल्पाला विरोध करण्यात आला आहे. यावेळी आरे बचावचा लढा हा पूर्ण आरे जंगल संरक्षित करण्याचा असल्याचे सेव्ह आरेच्या सदस्यांनी सांगितले. दरम्यान मेट्रो कारशेड, मेट्रो भवन, प्राणी संग्रहालय, आर टी ओ कार्यालय, SRA या सगळ्याला मुंबईकरांचा विरोध असल्याचे देखील सांगण्यात आले.

विषय केवळ वारेमाप वृक्ष तोडीशी संबंधित नसून राज्यातील नद्यांशी देखील तीच बकाल अवस्था असून पर्यावरणाचे अक्षरशः धिंडवडे काढले जात आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच उदाहरण द्यायचं झाल्यास, देहूनगरीतील इंद्रायणी नदीत तब्बल १५,००० च्या जवळपास मोठं मोठे मासे मृत अवस्थेत आढळले होते. त्या रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रानजाई संस्थेचे सोमनाथ आबा मसूडगे हे इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यासाठी काही सदस्यांसह आले होते. तेव्हा, त्यांना नदीमध्ये मृत मासे मोठ्या संख्येने आढळले होते. सकाळी ७ वाजेपासून १०० ते १५० व्यक्ती सायंकाळी ६ पर्यंत हे मृत मासे नदीतून बाहेर काढत होते. या घटनेमुळे स्थानिक वारकऱ्यांमध्ये संतापाची भावना पाहायला मिळाली होती . सदर धक्कादायक घटनेमुळे नदीचे पावित्र धोक्यात आले असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. आषाढी वारी निमित्त लाखो वारकरी येथील इंद्रायणी नदीत स्नान करत असतात. परंतु, अशा प्रकारामुळे नदीत मैलायुक्त सांडपाणी आणि रासायनिक पाणी सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता. विषय केवळ इंद्रायणी नदीतील प्रदूषणाचा नव्हता तर राज्यातील जवळपास सर्वच नद्यांची हीच दयनीय अवस्था आहे. त्यात मुंबईतील ऐतिहासिक ओळख असलेली आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून उगम पावणारी मिठी नदी केव्हाच स्वतःच अस्तित्व गमावून बसली असून आता तिची ओळख एक सांडपाणी वाहणारा नाला अशी झाली आहे, ज्याला एमएमआरडीए’ने दोन्ही बाजूला भिंतीचे आवरण दिले जेव्हा मुंबईत याच नदीने स्वतःचं रौद्ररूप २६ जुलै रोजी झोपलेल्या मुंबईकरांना दाखवलं.

दरम्यान सरकार नद्यांच्या प्रदूषणावर जनजागृती करण्याच्या नावाखाली ‘रिव्हर अँथम’ काढून, केवळ स्वतःचे वैयक्तिक आणि कौटुंबिक चोचले पूर्ण करण्यात रममाण आहे, मात्र नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही जमिनीवरील हालचाली किंवा उपक्रम राबवताना दिसत नाही, अशी तीव्र भावना देखील निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत. मुंबई असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र, नद्यांची अवस्था प्रदूषणामुळे अत्यंत दयनीय आहेत हे वास्तव आहे. मात्र देश आणि जगभर फॅशन शोमध्ये हरवलेले हे हायप्रोफाईल राजकारणी आज समाजसेवेचे जागतिक पुरस्कार विजेते होतं आहेत, हे देखील विचार करायला लावण्यासारखे आहे. त्यात स्वतःच्या कुटुंबाकडे असलेली राजकीय आणि प्रशासकीय ताकद हे हायप्रोफाईल राजकारणी निर्सार्गासंबंधित विषयांवरून कधीच वापरताना दिसत नाहीत. मेट्रो प्रकल्पाचा कार शेड हा आरे कॉलनीच्या जंगलात बनवणं म्हणजे मुंबईच फुफ्फुस जाळण्यासारखं असून, स्वार्थी राजकीय लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्याचं गांभीर्य कधीच उमगणार नाही हे सत्य आहे. कारण आरे कॉलनीतील जंगलातील वृक्षांच्या बेसुमार कत्तलीवरून सामान्य महिला देखील मुंबई पालिका आणि एमएमआरसीएल’च्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत आहेत.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x