14 December 2024 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

सोमैयांची आरोप पर्यटन यात्रा | मागील ३ दिवसांत ४ दौरे | सत्तेत असताना मुलुंडमध्येच असायचे व्यस्त

Kirit Somiya

कराड, २० सप्टेंबर | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचं सत्र किरीट सोमय्या यांनी सुरू केलं आहे. आजही ते कराडमध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी ते कोणता नवा गौप्यस्फोट करणार, ठाकरे सरकारवर निशाणा साधत ते काय बोलणार हे पाहण्यासारखं होतं. किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा रोखणं, पोलिसांनी नोटीस बजावणं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. यावेळी बोलताना सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

सोमैयांची आरोप पर्यटन यात्रा, मागील ३ दिवसांत ४ दौरे, सत्तेत असतानाही एवढा त्रास काढला नव्हता – BJP leader Kirit Somaiya’s allegations tour of Maharashtra :

सोमय्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे की, घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक केली जात आहे. मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करायची आहे, तक्रारदाराला राखण्याचे काम, जिल्हाबंदी करण्याचे काम ठाकरे सरकारने केलं आहे. मला दिलीप वळसे पाटील यांना विचारायचे आहे की मला कोणत्या आदेशा अंर्तगत गणेश विसर्जन करण्यापासून रोखलं, मला माझ्या कार्यालयात कोंडून ठेवण्यात आलं.

ते पुढे म्हणाले, ठाकरे सरकारची ठोकशाही बघा, CSMT मध्ये मला धक्काबुक्की केली, ट्रेन मिळू नये यासाठी मला स्टेशन बाहेर अडवलं. मी त्यांना विचारलं कोणत्या नियमा अंतर्गत अडवत आहेत त्यावर कोल्हापूर जिल्हाधिकारी यांचे पत्र दाखवले. त्या ऑर्डर चॅलेंज केलं ते पळून गेले, ठाकरे सरकारचे पोलीस खोटी ऑर्डर दाखवतात, व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणतात, ठाकरे सरकारने हिरवा रंग धारण केला असेल, भगवा रंग सोडून दिला असेल. पण ते मला गणपती विसर्जनापासून रोखू शकत नाहीत असं म्हणाले.

दरम्यान, किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी सोमय्या यांना जिल्हाधिकाऱ्यांनी रितसर नोटीस दिली आहे. मात्र, काहीही झालं तरी मी कोल्हापूरला जाणाराच. माझा नियोजित दौरा पूर्ण करणारच असा निश्चय सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या या भूमिकेमुळे त्यांना थांबवण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ते कोल्हापूरकडे रवाना झाले असले तरी त्यांना कोल्हापुरात जाण्यापूर्वीच रोखले जाण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यावर पोलीस तसेच सरकारला का आक्षेप आहे ? याची चर्चा होऊ लागली आहे. सोमय्या या दौऱ्यात नेमकं काय करणार आहेत ? असं विचारलं जात आहे.

हसन मुश्रीफ यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा केलाय:
किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील मंत्री तसेच नेत्यांवर मोठे आरोप केले आहेत. नुकतंच त्यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा केलाय. याच कथित गैरव्यवहाराची सखोल माहिती घेण्यासाठी मी कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. उद्या म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी ते कोल्हापूरला जाणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांना कोल्हापुरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्याची पाहणी करणार:
किरीट सोमय्या चार दिवसांसाठी दौऱ्यावर आहेत. 20 सप्टेंबरला कोल्हापुरात जाऊन सोमय्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्याची पाहणी करणार आहेत. तसचे 23 सप्टेंबपरला ते पारनेरमधील आणखी एका साखर कारखान्याला भेट देतील. तसेच या सारख कारखान्याचीही सर्व माहिती ते जाणून घेतील. त्यानंतर 27 सप्टेंबर रोजी अलीबाग येथे जाऊन रश्मी ठाकरे यांच्या अलीबागच्या गोलाई येथील बंगल्याची पाहणी करतील. तसेच शेवटीच 30 सप्टेंबर रोजी सोमय्या उपमुख्यंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यालाही भेट देणार आहेत. या सर्व ठिकाणांवर आर्थिक गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचार झाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: BJP leader Kirit Somaiya’s allegations tour of Maharashtra.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x