22 October 2021 12:08 PM
अँप डाउनलोड

सोमय्या आता रश्मी ठाकरेंना लक्ष करताना त्यांच्या मालमत्तेवरून अलिबाग 'आरोप पर्यटन दौरा' करणार

Kirit Somiya

कराड, २० सप्टेंबर | महाविकास आघाडी सरकारमधील अनिल परब, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ अशा सत्ताधारी मंत्र्यांनंतर किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वळवला आहे. काल गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत सोमय्या यांना विसर्जनात सहभागी होण्यापासून अडवण्यात आलं तर त्यांचा कोल्हापूर दौराही पोलिसांनी होऊ दिला नाही. त्यांना कराडमध्येच अडवण्यात आलं. यावेळी सोमय्या यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवरच प्रहार केले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सोमय्या आता रश्मी ठाकरेंना लक्ष करताना त्यांच्या मालमत्तेवरून अलिबाग ‘आरोप पर्यटन दौरा’ करणार – BJP leader Kirit Somaiya will visit Alibaug to make allegations on Rashmi Thackeray says in press conference :

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या म्हणाले, मी गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार आहे. तिथेही मोठा गैरव्यवहार घडलेला आहे. पुढच्या सोमवारी २७ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये बंगल्यांचा जो घोटाळा केला आहे, त्याची पाहणी मी करणार आहे. तर अजित पवारांनी जो बेनामी कारखाना विकत घेतला आहे, जरंडेश्वर कारखाना त्याची पाहणी करायला ३० तारखेला जाणार आहे.

सचिन सावंतांकडून सोमय्यांवर आरोप:
दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर देताना भाजप नेत्यांवर पलटवार केलाय. सोमय्या दुसऱ्यांच्या मालमत्ता तिसऱ्याच्या म्हणून दाखवतात, ती त्यांची जुनी सवय आहे, असं म्हणत सचिन सावंत यांनी सोमय्यांची खिल्ली उडवली.

किरीट सोमय्या दुसऱ्यांच्या मालमत्ता तिसऱ्याच्या म्हणून दाखवतात. कोणाच्याही जागेकडे बोट दाखवून बेनामी म्हणतात म्हणून जनतेत भीती आहे. याचकरिता बंदी घातली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या शाखा झाल्या असतानाही त्यांचे काम भाजपा करणार का? सोमय्यांनी नौटंकी कायद्याच्या चौकटीत करावी”, असं सचिन सावंत म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: BJP leader Kirit Somaiya will visit Alibaug to make allegations on Rashmi Thackeray says in press conference.

हॅशटॅग्स

#KiritSomaiya(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x