27 July 2024 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

Rain Alert | महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट! कोकणासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी पाऊस पडणार, पाऊस शनिवार-रविवारही गाजवणार

Rain Alert

Rain Alert | मान्सूनची वाटचाल सकारात्मक वेगानं सुरु असतानाच आता महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यामध्ये काही भागांत मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमानात, कमालीचे चढ- उतार पाहायला मिळाले. तर, काही भागांमध्ये हवेतील आर्द्रतेमुळं उकाडा अपेक्षेहून जास्त असल्याचं भासत होतं. त्यातच कोल्हापुरात पावसानं धुमाकूळ घातलं. महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस अचानक धुमाकूळ घालेल असं पाहायला मिळतंय. त्यामुळे या विंकेन्डला फिरायला जाणार असाल तर पावसाने कुठेतरी अडकून पडण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसाने कोल्हापुराला झोडपून काढलं
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने कोल्हापुराला झोडपून काढलं. जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाल्याचंही पाहायला मिळालं. श्रीक्षेत्र आदमापुरात मंदिराबाहेर असणाऱ्या छोट्या व्यापारांचं या पावसामुळं मोठं नुकसान झालं. मंडप आणि घरांवरील पत्रे उडाल्यामुळं अनेकांचीच तारांबळ उडाली.

हवामानाचा अंदाज
सध्याच्या घडीला विदर्भापासून तामिळनाडूपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. जो मराठवाडा, कर्नाटकातून पुढे जात असून, त्यामुळं या भागांमध्ये हवामानबदलांनी नोंद केली जाऊ शकते. तिथे देश पातळीवर सांगावं तर, सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावाताचे परिणाम पुढील 2 दिवस कायम असणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळं सध्या उत्तराखंडमधील नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. या भागात 2 जूनपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळं प्रशासनही सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे. पुढील 2 दिवसांमध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

News Title : Rain Alert weekend weather report update for monsoon predictions on 01 June 2023.

हॅशटॅग्स

#Rain Alert(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x