14 July 2020 6:41 PM
अँप डाउनलोड

बीड भाजप'मय करणार होत्या; आज स्वतःच आमदार कसं व्हायचं या पेचात अडकल्या पंकजा?

NCP, Shivsena, Congress, BJP, Beed, Pankaja Munde

बीड: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील वाद मुख्यमंत्रीपदाच्या निमित्ताने विकोपाला गेला. मात्र, त्यानंतर राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सत्तास्थापनेच्या घडामोडी वेग घेऊ लागल्याचं पाहायला मिळालं. राज्यात राष्ट्रपती राजवट जरी अंमलात आली असली तरी सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाशिवआघाडी सत्तास्थापन करेल अशी शक्यता अधीक आहे. विशेष म्हणजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच सोशल मीडिया स्टेटस देखील बदलल्याने भाजपच्या अपेक्षा संपुष्टात आल्या आहेत हे स्पष्ट आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

दुसरीकडे याच निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या अनेक दिग्ग्जना घराचा रस्ता दाखवला आहे. त्यात परळी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचं नाव प्राधान्याने घ्यावं लागेल, ज्यांचा पराभव राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी केला आणि बीडच्या राजकारणात इतिहास रचला गेला. भाजपच्या मंत्रिमंडळातील दिग्गज नेत्या आणि स्वर्गीय. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पराभूत झाल्याने त्याची चर्चा देखील रंगली.

तत्पूर्वी प्रचारात बीड जिल्ह्यातील सर्व जागांवर भाजपचे आमदार निवडून आणल्याशिवाय शांत बसणार नाही अशी शपथ घेणाऱ्या पंकजा मुंडे स्वतःच पराभूत झाल्याने मोठी नामुष्की ओढवली आहे. त्यात नव्या सरकारच्या स्थापनेचा कार्यक्रम अजून सुरु आहे आणि त्यात मोठी मोठी स्वप्नं पाहणारे भाजपचे विद्यमान नेते २-३ महिने दुःखातून बाहेर येणार नाहीत असं त्यांचे चेहरेच सांगतात. मात्र त्यात पंकजा मुंडे यांच्याकडे ना मंत्रिपद ना आमदारकी अशी दयनीय अवस्था झाली आहे. परळी मतदार संघातून धनंजय मुंडे मोठ्या मताधिक्याने विजय झाले. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा चर्चेत आला होता.

दरम्यान, गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे तसेच शेवगावच्या आमदार मोनिका राजळे यांनी पंकजा मुंडेंसाठी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. मात्र स्वतःचे आमदार गमावले तर आपलं अस्तिव काय उरणार आणि आमदारकी सोडली आणि त्यानंतर देखील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत त्यांना पुन्हा पाडलं तर मोठी नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याग करण्यास तयार असलेले आमदार स्वतः देखील राजकारणाच्या बाहेर फेकले जातील अशी शक्यता आहे.

दरम्यान पंकजा यांना विधान परिषदेवर घेण्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात सुरू होती. मात्र भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद यानुसार पंकजा यांना विधान परिषद दिल्यानंतर मंत्रीपद देता येणार नाही, असाही एक मतप्रवाह आहे. त्यामुळे पंकजा मुंडे कोणत्या मार्गाने विधीमंडळात जाणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असं सत्ता समिकरण जुळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे विधान परिषदेवरच जाणार अशी दाट शक्यता असली तरी भाजप शेवटच्या क्षणी काय खेळी खेळेल सांगता येणार नाही.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x