14 July 2020 7:37 PM
अँप डाउनलोड

'ते' दुसरे उदयनराजे बनायला गेले, पण स्वतः उदयनराजें'नी 'तुम्ही उरका' आता म्हणत त्यांना जमिनीवर आणलं

पुणे : मराठा आरक्षणावरून राजीनामा देणारे शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव मराठा आरक्षणाच्या मुद्दयांवर बोलताना संधी मिळताच मूळ आरक्षणाच्या मुद्यावरील तोडगा किंवा मार्ग यावर न बोलता थेट मिळेल तेथे मराठ्यांच्या स्वतंत्र पक्ष काढण्यावर त्यांची गाडी घसरवताना वारंवार दिसत आहे. त्यामुळे त्यांचं राजीनाम्यानंतरच एकूण वागणं म्हणजे स्वतःला मराठ्यांच नैतृत्व म्हणून समोर आणण्याचा प्रयत्नं असल्याचं अनेकांना जाणवू लागल होत.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

हर्षवर्धन जाधवांची एकूण कार्यशैली म्हणजे स्वतःला दुसरे उदयनराजे समजत असल्याची एकूणच देहबोली सांगत होती. परंतु त्यांचा सामना पुण्यात खुद्द खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी झाला आणि ते एका शब्दातच जमिनीवर आले. त्याचा प्रत्यय पुण्यातील मराठा समाजाच्या समन्वयकांच्या बैठकीत आला. या परिषदेला कोणत्याही राजकीय नेत्याला या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले नव्हते.

सामान न्यायाप्रमाणे “राऊंड टेबल’ पद्धतीने बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि बोलण्यासाठी प्रत्येकाल वेळ निश्चित करून देण्यात आली होती. त्यानंतर बैठकीतील एकूण विषयांवर आणि निर्णयावर स्वतः उदयनराजे भोसले पत्रकारांना संबोधित करणार होते असं ठरलं होत. परंतु बैठकीला अनेक प्रतिनिधी असल्याने वेळेची प्रचंड मर्यादा होती. अनेकांनी त्यांचे मुद्दे समोर मांडत भावना व्यक्त केल्या आणि त्यानुसार आमदार हर्षवर्धन जाधव बोलण्यासाठी उभे राहिले. नेहमीप्रमाणे त्यांनी मराठ्यांच्या राजकारणासाठी स्वतंत्र मराठा पक्ष काढण्याची मागणी त्यांनी पुढे रेटली. जाधव इतर मुद्याकडे भरकटून समाजापेक्षा स्वतःच्या गाथा सांगण्यात रममाण झाल्याचे निदर्शनास येताच त्यांना चंद्रकांत पाटील यांनी भाषण आटपण्यास सांगितलं. परंतु ते हर्षवर्धन जाधव यांना खटकलं.

जाधवांना ते खटकताच त्यांनी चंद्रकांत पाटलांना ‘तुम्हा प्रत्येकाला दाबत आहात’ असे बोल सुनावले. परंतु तरी पाटलांनी वेळेची मर्यादा त्यांचा ध्यानात आणून दिली तरी जाधव ऐकण्यास तयार नव्हते. नंतर श्रीमंत कोकाटे यांनी उठून पाटील या बैठकीचे संयोजक असल्याने त्याच्या सांगण्याप्रमाणे चालावे असे सूचित केले. जाधवांच्या अशा वागण्यावर तिथे उपस्थित असलेले खासदार उदयनराजे जाधवांना काय बोलणार याकडे सर्वजण पाहू लागले. उपस्थितांना वाटलं उदयनराजे सुद्धा जाधवांची बाजू घेतील, परंतु स्वतः उदयराजेंनी जाधवांकडे पाहून एकच लाईन उच्चारली की, ‘तुम्ही उरका’ आणि हर्षवर्धन जाधव खाली बसले आणि काही वेळाने बैठक अर्थवट सोडून निघून गेले. त्यामुळे हर्षवर्धन जाधव जमिनीवर आल्याची चर्चा रंगली होती.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x