3 August 2020 2:10 PM
अँप डाउनलोड

इंद्रा नुयी 'पेप्सिको'च्या सीईओ'पदाचा राजीनामा देणार

नवी दिल्ली : तब्बल बारा वर्षांच्या सेवेनंतर पेप्सिको’च्या सीईओ इंद्रा नुयी पदाचा राजीनामा देणार आहेत. त्या ३ ऑक्टोबर रोजीी पदावरुन पायउतार होतील असं समजतं, परंतु त्यांच्या राजीनाम्यामुळे बिझनेस वर्तुळात आश्चर्याचा धक्का बसला आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

पेप्सिको ही जगातील प्रमुख ब्रीवरेज कंपनी त्यांच्या कालखंडात ऊतुंग भरारी घेतली आहे आणि त्यांचा जागतिक बिझनेस क्षेत्रात चांगलाच दबदबा होता. इंद्रा नुयी यांनी २००६ साली कंपनीच्या सीईओपदाची सुत्रे स्वीकारली होती. त्यानंतर, पेप्सिकोचा आर्थिक व्यवहार वाढविण्यात आणि कंपनीला एका उंचीवर बसविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

पेप्सिको कंपनीच्या सीईओपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिला महिला होत्या. सन २००१ मध्ये सीएफओ पदावर त्यांनी पेप्सिको कंपनीत त्यांच्या कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांच्या नैत्रुत्वात कंपनीच्या नफ्यात २.७ बिलियन्स डॉलर्सने वाढ होऊन तो ६.५ बिलियन्स डॉलरपर्यंत वर पोहोचला आहे. त्यातूनच त्यांचं नैतृत्व सिद्ध होत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x