2 May 2024 10:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल
x

Vodafone Idea Share Price | किंमत 16 रुपये! व्होडाफोन आयडिया शेअर्स खरेदीची योग्य वेळ? 1 दिवसात 15% परतावा

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. व्होडाफोन आयडिया स्टॉकने नवीन वर्षाची सुरुवात जोरदार तेजीसह केली आहे. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे.

1 जानेवारी 2024 रोजी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 18.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.29 टक्के घसरणीसह 16.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 2 ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल 37 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार व्होडाफोन आयडिया कंपनीचे प्रवर्तक इक्विटी इन्फ्युजन करण्याची शक्यता आहे. मागील सहा महिन्यांपासून व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली होती.

मागील वर्षी एप्रिल 2023 मध्ये कुमार मंगलम बिर्ला यांना कंपनीच्या अतिरिक्त संचालक पदावर नियुक्त करण्यात आले होते. कुमार मंगलम बिर्ला हे सध्या आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन देखील आहेत. या ग्रुपचा व्यवसाय विविध 14 क्षेत्रात विस्तारला आहे. या नियुक्तीनंतर व्होडाफोन आयडिया कंपनीच्या गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक वाढला आहे.

मागील सहा महिन्यांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. व्होडाफोन आयडिया स्टॉक कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18.42 रुपये इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहोचला होता. . या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 5.70 रुपये होती.

मागील 6 महिन्यांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 114 टक्के परतावा कमावून दिला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीवर सध्या प्रचंड कर्जाचे डोंगर निर्माण झाले आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीला 8738 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. तर जून 2023 तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीला 7840 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. सप्टेंबर 2023 तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीने 0.9 टक्क्यांच्या वाढीसह 10,716 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 02 January 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(46)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x