7 August 2020 9:24 AM
अँप डाउनलोड

लालू प्रसाद आणखी प्रकरणातही दोषी, ५ वर्ष कारावास.

रांची : आरजेडीचे सर्वेसेवा लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील तिसऱ्या खटल्यातही दोषी ठरवण्यात आले असून त्यांना ५ वर्षाची शिक्षा ही सुनावण्यात आली आहे. लालू यादव यांच्या बरोबरच बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह ५० आरोपींना ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि ५ लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यातील ६ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

त्यांना लवकरच त्यांना हजारीबागच्या खुल्या कारागृहात पाठवलं जाणार आहे. तिथं त्यांना माळी काम दिलं जाणार आहे. तसेच शिक्षा सुनावली गेल्याने ते पुढची किमान १६ वर्षे निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरणार आहेत. मोदी सरकारच्या विरोधात दंड थोपटल्यानेच लालू प्रसाद यांना चारा घोटाळ्यात अडकवण्यात आल्याचा आरोप आरजेडीने यापूर्वीच केला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x