26 July 2021 2:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

मोदींना जोरदार चपराक देण्याची इच्छा, ममता-मोदी वर्ड वॉर

BJP, narendra modi, trunmul congress, mamta banerjee, loksabha 2019

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीतील ‘वर्ड वॉर’ जरा जास्तच पेटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील शाब्दीक चकमक काही थांबता थांबेना. जय श्रीरामच्या घोषणेवरून मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ममता म्हणाल्या म्हणाल्या, ‘मोदी हे दुर्योधन आणि रावनाचा अवतार आहेत’. त्यांना लोकशाहीची जोरदार चपराक मारावी वाटते, असंही त्या पुढे म्हणाल्या.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पंतप्रधान मोदींनी एका सभेत म्हटले होते की, पश्चिम बंगालमध्ये ‘जय श्रीराम’ बोलणाऱ्यांना अटक करण्यात येते. पश्चिम बंगालमध्ये देवाचं नाव घेण्यास बंदी आहे. त्यावर ममता बॅनर्जी यांनी मोदींवर जोरदार टीका केली. जेव्हा मोदी म्हणाले तृणमूल काँग्रेस हा गुंडांचा पक्ष आहे, त्याचवेळी मनात आले की मोदींना जोरदार चपराक लागवावी. आजपर्यंत असा खोटारडा पंतप्रधान मी पाहिला नाही. निवडणुका आल्या की यांना राम आठवतो, अच्छे दिनचे स्वप्न दाखवले आणि नोटबंदी केली, अशी घणाघाती टीका ममता यांनी केली.

पुढे त्या म्हणाल्या मी स्वत:ला विकून राजकारण करत नाही तसेच मी कुणालाही घाबरत नसून निडरपणे जगते. मोदी केवळ दंगे भडकवण्यात आग्रेसर आहेत, धर्माच्या नावावर जनतेत फूट पाडत असल्याची टीका देखील ममता यांनी मोदींवर केली.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x