15 May 2021 3:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ओक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली
x

शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंनी मला एकत्रित काम करण्याची ऑफर दिली होती, नारायण राणेंचा गौप्य्स्फोट

Raj Thackeray, narayan rane, uddhav thackeray, nitesh rane, shivsena, mns, maharashtra swabhiman paksh

मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष, माझी शिवसैनिक नारायण राणे यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले असून त्यातून वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. खुलासे म्हणण्यापेक्षा विवादित खुलासे म्हणायला काही हरकत नाही, त्यास कारण देखील तसेच आहे. त्यांच्या आत्मचरित्रातून बराचसा इतिहास उलगडला आहे, हा इतिहास फार कमी लोकांना माहित आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

२००६ साली राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती तसेच शिवसेना सोडण्या आगोदर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता. दौऱ्याचे कारण म्हणजे आपल्या मागे किती लोकांचे पाठबळ आहे हि त्याची पूर्ण चाचणीच होती. राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळेस त्यांच्यासोबत शिवसेनेतील काही नामांकित चेहरे देखील राज ठाकरेंसोबत बाहेर पडले आणि त्यांना नवीन पक्ष उभारणीसाठी पाठिंबा दिला. शिवसेनेतील बाळा नांदगावकर, शिशीर शिंदे, प्रवीण दरेकर असे अनेक चेहरे त्यावेळेस राज ठाकरेंसोबत बाहेर पडले.

२००६ मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी नवीन पक्ष स्थापन करून एकत्रित काम करण्याचे निमंत्रण मला दिले होते असा खुलासा नारायण राणेंनी केला आहे. मात्र, मी त्यांना नकार दिला असल्याचा खुलासा नारायण राणेंच्या आत्मचरित्रातून मधून करण्यात आला आहे. राज यांनी शिवसेना सोडण्यापूर्वीच राणे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र ‘ केला होता.

शिवसेनामधून आपल्याला का काढण्यात आले याबाबत नारायण राणेंच्या आत्मचरित्रातून खुलासा झाला असल्याची बातमी ताजी असतानाच, आता राज यांच्याबद्दल झालेल्या नवीन गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच नारायण राणेंच्या आत्मचरित्रातून अजून काही खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हॅशटॅग्स

#NarayanRane(4)#RajThackeray(158)MNS(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x