18 November 2019 12:16 AM
अँप डाउनलोड

पंकजा मुंडे विरुद्ध २०१९ मधील खेळी, रमेश कराड राष्ट्रवादीत

बीड : भाजपमधील मुंडे गटाचे खंदे समर्थक रमेश कराड राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. रमेश कराड हे पंकजा मुंडे यांचे मानलेले बंधू असले तरी ते राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतर्फे विधानपरिषदेची उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी चर्चा आहे.

विधानपरिषदेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस जरी रमेश कराड यांना प्रतिनिधित्व देत असेल तरी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा राजकीय धक्का बसणार आहे. गेली अकरा वर्ष रमेश कराड हे मुंडे गटाचे खंदे समर्थक होते. रमेश कराड यांना राष्ट्रवादी विधानपरिषदेची उमेदवारी देणार अशी चर्चा आहे.

लातूर बीड उस्मानाबादचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार दिलीप देशमुख यांचा कार्यकाळ संपतो आहे. सलग तीन टर्म ही जागा दिलीप देशमुख राखली असली अंतरी यंदा त्यावर रमेश कराड यांना संधी देऊन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत खिंडीत गाठण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्नं आहे.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे रमेश कराड लातूर जिल्हा बँकेची निवडणूक कराड नाणेफेकीत पराभूत झाले होते. तसेच विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी पंकजा मुंडे सहमत नव्हत्या असे समजते त्याचाच राजकीय फायदा राष्ट्रवादीने उचलत पंकजा मुंडे यांना राजकीय धक्का दिला आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी रमेश कराड यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. बीड मधील राजकारणात ही मोठी राजकीय बातमी असून त्याचे परिणाम २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत पाहावयास मिळू शकतात असं राजकीय विश्लेषक बोलत आहेत.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(200)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या