15 December 2024 12:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज
x

मोदीजी तुम्ही वाराणसी व बडोद्यातून निवडणूक लढवली होती: प्रकाश राज

कर्नाटक : सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर पकडला असून स्वतः नरेंद्र मोदी सुद्धा प्रचारात उतरले आहेत. नरेंद्र मोदी यांनी भाषणातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर चौफेर टीका केली आहेत.

नरेंद्र मोदी सिद्धरामय्या यांच्यावर टीका करताना सिद्धरामय्या २ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक का लढवत आहेत असा मुद्दा उपस्थित केला. परंतु टीकेच्या ओघात त्यांच्याकडून चूक झाली आणि नेमका त्याचाच धागा पकडून प्रकाश राज यांनी ट्विट करत नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान मोदी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका करताना म्हणाले की, सिद्धरामय्या २ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. परंतु मोदीजी तुम्ही स्वतः वाराणसी आणि बडोद्यातून निवडणूक लढवली होती हे का विसरता असा खोचक टोला ट्विटरच्या माध्यमातून प्रकाश राज यांनी पंतप्रधानांना लगावला आहे.

पुढे ट्विटरवर टीका करताना प्रकाश राज म्हणाले की,’प्रिय मोदीजी आज जेव्हा तुम्ही कर्नाटकात मंचावर उभे होता. त्यावेळी मोठा गोंधळ सुरू होता. तेव्हा लोक तुमच्यावर हसताना तुम्ही पाहिलं का ? मोदीजी तुम्ही स्वतः वाराणसी आणि बडोद्यातून निवडणूक लढवली होती हे का विसरता ? असा खोचक प्रश्न केला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x