27 July 2024 10:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

उन्नाव, कथुआ सारख्या घटनांना पंतप्रधान मोदीच जबाबदार?

एकूण ४९ माझी सनदी अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केलेलं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. यांच्या मते दोन्ही घटना या भाजप शासित राज्यात घडल्या असून त्याची संपूर्ण जबाबदारी देशाचे प्रमुख व भाजपचे सर्वेसर्वा अमित शाह या दोघांवर आहे. मोदींना पाठवलेल्या पत्रात त्यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे.

जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले तेव्हा जनतेसमोर येऊन, चुका स्वीकारून, चुकांची दुरुस्ती करण्याऐवजी त्यांनी उलट मौन पाळणे पसंत केले. जेव्हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जनप्रक्षोभ झाला तेव्हा त्यांनी या प्रकाणावरील आपले मौन सोडले. शुक्रवारी त्यांनी समोर येऊन आमच्या मुलींना न्याय मिळेल आणि जे कोणी दोषी असतील त्यांची गे केली जाणार नाही असे जाहीर केले. परंतु त्यांनी जनतेसमोर येण्यास थोडा उशिरच केला.

काय लिहिले आहे पत्रात?
कथुआ येथील आठ वर्षाच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेत खूप पाशवीपणा आणि नृशंसता असून देश नीतिभ्रष्टतेच्या कुठल्या पातळीवर गेला आहे याची जाणीव होते. जेव्हा कुणी राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ घेतो तेव्हा आम्हाला अशी आशा आहे की ज्या सरकारचे तुम्ही प्रमुख आहात व ज्या पक्षाचे तुम्ही प्रतिनिधित्व करता त्यांनी या अधःपतनाने खडबडून जागे व्हायला हवे. समाजाला लागलेली ही कीड निपटून काढून सर्वाना आश्वस्त केले पाहिजे. विशेष करून अल्पसंख्यांक समाजाला सुरक्षित वाटेल असे वातावरण ठेवले पाहिजे. त्यांना जीवन व स्वातंत्र्याची भीती वाटता कामा नये. पण ती आशाच उद्ध्वस्त झाली आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

कथुआ येथील घटनेबाबत तो संघ परिवाराच्या सांस्कृतिक बहुसंख्याकवादाचा भांडखोर व आक्रमक नमुना असल्याचे म्हटले असून पाशवी जातीय वृत्तींचे धाष्टर्य़ त्यामुळे वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंदूुत्वाच्या नावाखाली माणसांना एकमेकांविरोधात लढवले जात आहे. समाज माणूस म्हणून अपयशी ठरत आहे. पर्यायाने देशही वांशिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा राखण्यात अपयशी ठरत आहे. सहिष्णुता, सहवेदना, बंधुत्व या भावना आपल्या समाजाच्या मुळाशी आहेत, पण त्याच नष्ट केल्या जात आहेत.

तुम्ही देशाचे पंतप्रधान म्हणून काय करायला हवे?
दोन्ही प्रकरणं तुमच्या भाजप शासित राज्यात घडली असून, देशाचा पंतप्रधान आणि तुमच्या पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून तुम्ही त्या दोन्ही कुटुंबांची माफी मागितली पाहिजे आणि त्यांना आश्वस्थ केले पाहिजे कि हे सरकार तुम्हाला न्याय देईल आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.

जनता म्हणून आमची अपेक्षा काय?
पंतप्रधान म्हणून तुम्ही आणि भाजप प्रमुख अमित शाह तुमच्याकडे सरकारचे सर्व अधिकार आहेत आणि तुम्ही सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कठोर शासन व्यवस्था करावी. स्पष्ट बहुमत मिळालेल हे देशातील सरकार गरीब आणि पीडितांसाठी काहीतरी करेल एवढीच आशा .

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x