13 August 2022 9:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Buying | कमी पैशात खरेदी करा मोठा फ्लॅट, बुकिंग करण्यापूर्वी या फॉर्म्युल्यासह करा वास्तविक क्षेत्रफळाची गणना Ratna Jyotish | आर्थिक तंगीत अडकलेल्यांना अर्थसंपन्न करेल हे शुभं रत्न, आर्थिक भरभराटीसाठी फायदेशीर अजब! स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधवांना सोबत घेऊन मुंबईतील भ्रष्‍टाचारी व्यवस्थेला तडीपार करणार? भाजपने जो घाबरेल त्याला घाबरवलं आणि जो विकला जाईल त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांनी अनेकांची लायकीच काढली Mutual Fund Top Up | म्युच्युअल फंड टॉप-अपचा दुहेरी फायदा कसा घ्यावा, मजबूत नफ्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या Viral Video | ती चालत्या गाडीच्या खिडकीबाहेर बॅलेन्स टाकून नाचत होती, पण तिच्यासोबत असं काही धक्कादायक घडलं Horoscope Today | 13 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

नाणार प्रकल्पासंबंधित कार्यालय मनसेने फोडलं

मुंबई : नाणारवासियांचा रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोध असल्याने कालच्या सभेत राज ठाकरे म्हणाले नाणार रिफायनरी कोकणात होणार नाही म्हणजे नाही आणि अखेर आज मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईस्थित ताडदेव येथील नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय फोडलं.

मनसेच्या कामगार सेनेने नाणार प्रकल्पासाठी काम करणारं मुंबईस्थित ताडदेव येथील कार्यालय फोडलं. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुंबईमधील ताडदेव येथील रिफायनरी अँड पेट्रो-केमिकल लिमिटेडच्या कार्यालयावर मनसैनिकांनी हल्ला चढवला.

काल मुलुंड मध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना सज्जड दम भरत इशारा दिला होता की, नाणारवासियांचा रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोध त्यामुळे हा प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही. कालच नाणारवासियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती आणि दुसऱ्याच दिवशी मनसैनिकांनी नाणार साठी काम पाहणाऱ्या रिफायनरी अँड पेट्रो-केमिकल लिमिटेडच्या कार्यालयावर मनसैनिकांनी हल्ला चढवला.

हॅशटॅग्स

#Raj Thakare(62)#Raj Thakarey(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x