27 May 2022 5:43 AM
अँप डाउनलोड

भारतात भडका उडणार! पेट्रोल शंभरी गाठण्याची शक्यता

सीरियन सरकारने सीरियन नागरिकांवर केलेल्या रासायनिक हल्ल्याचा निषेध करत अमेरिकेने सीरियन सरकारच्या या अमानवी कृत्याबद्दल त्यांना जशास तसे उत्तर देत त्यांच्या रासायनिक हत्यार साठवणीच्या ठिकाणी बॉम्ब हल्ले करून त्यांची रासायनिक शस्त्रास्त्रे उध्वस्थ केली. तसही सीरिया अंतर्युद्धामुळे अगोदरच त्रस्त असताना अमेरिका आणि युरोपिअन युनियनने सिरियासह तेलउत्पादक देशांवर आर्थिक निर्बंध घातल्याने हि परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

सद्यस्थितीत क्रूड ऑइल ची किंमत ७२ डॉलर प्रति बॅरल असून ती ८० डॉलर प्रति बॅरल जाण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर भारतात पेट्रोल च्या किमती ९० – १०० रुपये प्रति लिटर पर्यंत पोहोचण्याची शक्यता दिसतेय.

कच्य्या तेलाच्या किमती वाढल्या की त्याचा परिणाम भारतीय चलनावर पडेल आणि रुपया आणखी कुंकुवात होऊन महागाई वाढेल. परिणामी हा त्रास सामान्य जनमानसाला सोसावा लागेल. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला आणखी किती सोसावे लागेल याचा अंदाज लावता येईल.

सीरियावरील कारवाईमुळे पश्चिम आशियात तणाव कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने कच्च्या तेलाचे दर आणखी भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x