14 December 2024 12:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC
x

भाजपचे माजी खासदार व RSS विचार मानणाऱ्या सुभाष चंद्रांच्या वृत्तवाहिनीने केलेल्या चमत्कारी सर्व्हेचा शिंदेंनी आधार घेतला, समाज माध्यमांवर होतेय टीका

Opinion poll 2023

Survey Number Facts | राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वेक्षण झाले. त्या सर्वेक्षणाची जाहिरात शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो वापरला आहे. त्याशिवाय या जाहिरातीत कोणाचाही फोटो नाही.

त्या सर्व्हेवर कालपासून होतेय जोरदार टीका

नुकताच भाजपचे माजी खासदार आणि आरएसएस विचारधारा मानणारे सुभाष चंद्रा यांच्या मालकीच्या ‘झी न्यूज आणि मॅटराईझ’ या संस्थेने सर्वे केला. त्यात जर आत्ता निवडणुका झाल्या, तर राज्यात पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार बहुमताने घरवापसी करेल, असा म्हटलं गेलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदेंना बघायला जास्त आवडेल, असा कौल दिला गेला आहे. अनेक हिंदी वाहिन्यांनी काल हा सर्व्ह प्रसिद्ध केला आणि त्यातील चमत्कारी आकडेवरुन सर्वच टीव्ही वृत्तवाहिन्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजेसवर तुफान टीका होताना पाहायला मिळतेय. तसेच या सर्व्हे बाबत काल उशिरा माध्यमांकडे माहिती आली असली तरी शिंदे यांच्याकडे ती आधी पोहोचविण्यात आली आणि त्याचीच आज अनेक मराठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात करण्यात आल्याची माहिती आहे.

36 हजार लोकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला होता असं सांगण्यात आलं आहे. 23 मे ते 11 जून या कालावधीमध्ये हा सर्वे करण्यात आला असल्याचं ‘झी’ कडून सांगण्यात आलं आहे.

इतर सर्व्हेत शिंदे कोणालाच नको असले तरी सुभाष चंद्रा यांच्या वृत्तवाहिनीच्या सर्व्हेत शिंदेच हवेत

मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती? या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांना 26 टक्के पसंती देण्यात आली आहे, तर देवेंद्र फडणवीस यांना 23 टक्के पसंती मिळाली आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना 11 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. अशोक चव्हाणांना 9 टक्के, तर अजित पवारांना 7 टक्के व तर इतरांना 24 टक्के पसंती देण्यात आली आहे.

या सर्वेनुसार जर आज घडीला निवडणुका झाल्या, तर युतीला 46 टक्के मतं मिळू शकतील, तर महाविकास आघाडीला 35 टक्के मतदान होऊ शकते. यामध्येच मनसेला 3 टक्के मतं मिळू शकतात. त्याचबरोबर 2019 मध्ये काँग्रेससोबत जाण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्य होता की, अयोग्य? या प्रश्नावर 57 टक्के मतदारांनी हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत तब्बल ६५ लाख मतं घेणाऱ्या वंचित बहुजन विकास आघाडीची मतं हा सर्व्हेत अस्तित्वात नसली तरी मनसेला 3 टक्के मतं दाखविण्यात आल्याने या सर्व्हेवर कालपासून टीका होतं असून, हा सर्व्हे जाहिरात करण्यासाठी पुरस्कृत होता का असे प्रश्न नेटिझन्स समाज माध्यमांवर उपस्थित करत आहेत.

युती आणि महाविकास आघाडी पैकी कुठलं सरकार चांगलं आहे? या प्रश्नावर 48 टक्के मतदारांनी युतीला समर्थन दिलं, तर 32 टक्के मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मत दिलं.

इथे तर विनोदच केलाय?

विधानसभेच्या जागांचा विचार केला, तर भाजप सेना युतीला 165 ते 185 जागा मिळू शकतील, असा कौल या सर्वे मध्ये दिला गेला आहे. या सर्वेनुसार महाविकास आघाडीला 88 ते 118 जागा मिळू शकतात. आज निवडणुका झाल्या तर भाजप-सेना युती बहुमताचं सरकार स्थापन करु शकतं. राज ठाकरेंना या सर्वेमध्ये 2 ते 5 जागा मिळू शकतात, असं म्हंटलं आहे. तर इतर आणि अपक्ष अशा 12 ते 22 जागा मिळू शकतात.

थोडक्यात ६५ लाख मतं घेणारा वंचित बहुजन आघाडीला एकही जागा या सर्व्हेत नसली तरी राज ठाकरेंच्या मनसेला या सर्वेमध्ये 2 ते 5 जागा देण्यात आल्याने या सर्व्हेची जोरदार खिल्ली उडविण्यात येतं आहे.

शिंदेंचं १ वर्ष कोर्ट-कचेरी आणि सभा-दौरे घेण्यात गेलं तरी शिंदेंचा कारभार सर्वोत्तम?

मुख्यमंत्री म्हणून कुणाची कामगिरी चांगली होती? या प्रश्नावर केवळ 27 टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली होती, असं म्हटलं आहे. तर 45 टक्के मतदारांनी ठाकरेंची कामगिरी अत्यंत वाईट होती, असं म्हंटलं आहे. मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची कामगिरी चांगली असल्याचं 51 टक्के लोकांनी म्हंटलं आहे. तर 17 टक्के मतदार शिंदेंचं काम चांगलं नसल्याचं म्हटलं आहे.

थोडक्यात, अजून अर्णब गोस्वामी आणि इतर पुरस्कृत पत्रकारिता करणाऱ्या वृत्तवाहिन्यांचे सर्व्हे सुद्धा असेच असतील असं म्हटलं जातंय. मात्र शेवटी होतं तेच जे कर्नाटकात झालं.

News Title : Opinion poll 2023 ZEE Matrize opinion poll check details on 13 June 2023.

हॅशटॅग्स

#Opinion poll 2023(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x