15 May 2024 10:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

शेतकरी आंदोलनादरम्यान भारत सरकारकडून ट्विटर बंद करण्याच्या आणि कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापे टाकण्याच्या धमक्या - माजी सीईओ जॅक डोर्सी

Twitter former CEO

Jack Dorsey Twitter Former CEO | ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांच्या ताज्या मुलाखतीनंतर भारतीय जनता पक्षावर देशभरातून हल्लाबोल सुरु झाला आहे. 2021 मध्ये शेतकरी आंदोलना दरम्यान मोदी सरकारने ट्विटरवर खूप दबाव आणला होता, असा आरोप डॉर्सी यांनी एका मुलाखतीत केला आहे.

मात्र मोदी सरकार मधील मंत्र्यांनी हा आरोप फेटाळला आहे. उलट डोर्सी यांच्या कार्यकाळात ट्विटर भारतातील कायद्यांचे उल्लंघन करत होते, असा कांगावा मोदी सरकारमधील नेत्यांनी सुरु केला आहे. याशिवाय भाजपने ट्विटरचे नवे मालक एलन मस्क आणि डॉर्सी यांच्या कामाची तुलना करण्यास सुरुवात केली आहे. तसेच जो भाजपचा मूळ गुण आहे त्याप्रमाणे भाजप सरकारवर आरोप होताच हा देशाविरोधात हल्ला असल्याचा कांगावा सुरु केला आहे. काँग्रेससह विरोधी पक्ष भारतविरोधी गोष्टींना पाठिंबा देत असल्याची बोंबाबोंब भाजपने सुरु केली आहे.

डोर्सी काय म्हणाले?

एका मुलाखती दरम्यान डोर्सी यांनी आरोप केला होता की, शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरवर दबाव टाकण्यात आला होता. माजी सीईओंच्या म्हणण्यानुसार, जर आमचे शब्द पाळले नाहीत तर भारतात ट्विटर बंद केले जाईल आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापे टाकले जातील.

मोदी सरकारची प्रतिक्रिया

‘जॅक डॉर्सी यांचे हे खोटे आहे. कदाचित ट्विटरच्या इतिहासातील तो अत्यंत संशयास्पद कालखंड पुसून टाकण्याचा प्रयत्न असावा. डोर्सी आणि त्यांच्या टीमच्या काळात ट्विटर वारंवार आणि सातत्याने भारतीय कायद्याचे उल्लंघन करत होते. ट्विटर ही एक अशी कंपनी आहे जी मानते की त्यांना भारतीय कायद्याचे पालन करणे आवश्यक नाही. तिला भारतीय कायद्याचे पालन करण्याची गरज नाही असे तिचे मत होते आणि जसजशी ती प्रगती करत गेली तसतसे तिने स्वतःचे नियम बनवले. भारतात कार्यरत असलेल्या सर्व कंपन्यांना भारत सरकारने सुरुवातीपासूनच स्पष्ट केले आहे की, त्यांना नेहमीच भारतीय कायद्याचे पालन करावे लागते

News Title : Twitter former CEO Jack Dorsey serious allegations on Modi Govt check details on 13 June 2023.

हॅशटॅग्स

#Twitter former CEO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x