कर्नाटक : भाजप अध्यक्ष अमित शहांच्या जिभेवरच नियंत्रण सुटलं आणि कर्नाटकातील पत्रकार परिषदेदरम्यान स्वतःच्याच माजी मुख्यमंत्र्याला सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री म्हणाले. सध्याच्या काँग्रेस सरकारच्या कारभारा विरुद्ध अमित शहांनी पत्रकार परिषद घेतली खरी, परंतु भाजपच्याच माजी मुख्यमंत्र्याला सर्वात भ्रष्ट बोलून बसले. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकाच हशा झाली.
परंतु त्यांच्या बाजूला उपस्थित इतर स्थानिक नेत्यांच्या ते लगेचच ध्यानात आले आणि त्यांनी हळूच अमित शहांच्या कानात चूक झाल्याचे निदर्शनास आणले. सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले असून निवडणूक आयोगाने सुद्धा अधिकृत पणे मतदानाची आणि मतमोजणीची तारीख जाहीर केल्या आहेत.
निवडणूक म्हटल्या की, भाजपला इतक्या गुदगुल्या का होतात तेच सामान्यांना कळेनासं झालं आहे. सकाळी भाजप ‘IT सेल’ चे प्रमुख मालवीय निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभेच्या तारखा घोषित करण्यापूर्वीच ट्विटर वर तारखा घोषित करून बसले आणि नंतर ते काढून टाकलं, आता अमित शहा स्वतःच्याच माजी मुख्यमंत्र्याला सर्वात मुख्यमंत्री भ्रष्ट बोलून बसले आहेत. निवडणुकीत हे चांगलंच गाजणार असं काहीस चित्र आहे.
