28 July 2021 8:01 PM
अँप डाउनलोड

बनावट निवडणूक ओळखपत्र प्रकरणी भाजप तोंडघशी: कर्नाटक

बंगळूरू : कर्नाटक विधानसभेच्या तोंडावर बंगळूरूतील राज राजेश्वरी नगरमधील जलाहल्ली येथील फ्लॅटमध्ये बनावट निवडणूक ओळखपत्रे पकडण्यात आली होती. अखेर तो फ्लॅट भाजपाच्या माजी नगरसेविकेचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सुरुवातीला भाजपने बनाव आणत त्याचा संबंध काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा केविलवाणा प्रयत्नं केला होता. परंतु चौकशीअंती वास्तव समोर येताच भाजप तोंडघशी पडली आहे. ज्या फ्लॅट मध्ये ही बनावट निवडणूक ओळखपत्रे पकडण्यात आली तो फ्लॅट भाजपाच्या माजी नगरसेविकेचा असल्याचे स्पष्ट झाले असून काँग्रेसने सखोल चौकशीची मागणी केली आहे, त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित फ्लॅटची मालकीण मंजुळा नानजामरी यांनी दिलेल्या माहितीनुसार १९९७ ते २००२ दरम्यान त्या स्वतः भाजापच्या नगरसेविका होत्या. मात्र माझा काँग्रेस सोबत कोणताही राजकीय संबंध नसल्याचे सुद्धा स्पष्ट केलं आहे. स्वतः मंजुळा नानजामरी यांनीच हा उलगडा केल्याने भाजप चांगलीच तोंडघशी पडली आहे.

भाजपचे कर्नाटकचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी स्वतःच्याच माजी नगरसेविकेला केवळ पक्षाला वाचविण्यासाठी निरुपयोगी ठरवले असा थेट आरोप काँग्रेसने केला आहे. तर दुसरीकडे भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी भूतकाळात १५ वर्षे मंजुळा नानजामरी या भाजपाच्या नगरसेविका होत्या हे मान्य केलं, परंतु मंजुळा नानजामरी यांचा आता भाजपाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

एकूणच चौकशी पुढे आलेल्या वस्तुस्थितीमुळे भाजप चांगलीच अडचणीत सापडली आहे.

हॅशटॅग्स

#Congress(502)BJP(441)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x