23 November 2019 8:09 AM
अँप डाउनलोड

प्रचारात गांधीनी देशाला काय दिल ? नंतर इंदिरा कॅन्टीनमध्ये जेवणावर ताव

कर्नाटक : कर्नाटक प्रचारात भाजप मोदींपासून सर्वच नेते संपूर्ण गांधी घराण्यावर आगपाखड करताना दिसत आहेत. तसेच काँग्रेसने देशाला आणि कर्नाटकातील जनतेला काय दिल असं म्हणत आहेत आणि त्याच काँग्रेसच्या इंदिरा कॅन्टीनमध्ये जेवणावर ताव मारत आहेत.

नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणा दरम्यान कर्नाटकातील जनतेला प्रश्न विचारत आहेत की, काँग्रेसने कर्नाटकातील जनतेला काय दिल ? परंतु दुसरीकडे वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या ज्या योजनांचा मोदी फसव्या असा उल्लेख करत आहेत त्याच काँग्रेसच्या इंदिरा कॅन्टीनमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना पोटाची खळगी भरावी लागत आहे. इंदिरा कॅन्टीनमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जेवणावर ताव मारला की ते पुन्हां काँग्रेसच्या विरुद्ध घोषणा देण्यासाठी सज्ज होत आहेत असं चित्र आहे.

भाजप कार्यकर्त्यांचे इंदिरा कॅन्टीनमध्ये जेवणावर ताव मारतानाचे फोटो वायरल झाले आहेत. समाज माध्यमांवर भाजपला ट्रोल केलं जात आहे. स्वतः सिद्दरमय्या सरकारमधील मंत्री कृष्णा गौडा यांनी हे फोटो ट्विट करून भाजपच्या प्रचारातील मुद्यांची हवा काढून टाकली आहे. सिद्दरमय्या सरकारमधील मंत्री कृष्णा गौडा फोटो ट्विट करताना लिहिलं आहे की, ‘आमच्या कॅन्टीनचा फायदा भाजपा समर्थकांना होत असल्याचा आनंद आहे. कॅन्टीन सर्वसामान्यांना परवडणारं आहे हेच यातून सिद्ध होतंय. काँग्रेस सरकारचे आभार’.

प्रचारादरम्यान भूक लागल्याने स्वस्त जेवणाच्या शोधात भाजप कार्यकर्त्यांना अखेर इंदिरा कॅन्टीनमध्ये जाऊन आपली भूक मिटवावी लागत आहे आणि ज्यांच्यावर टीका करत आहेत, त्यांच्याच योजनांचा फायदा उचलत आहेत आणि प्रचारात पुन्हा काँग्रेसने काहीच केलं नाही म्हणून नारे देत आहेत.

हॅशटॅग्स

#Congress(302)BJP(415)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या