2 July 2020 9:01 PM
अँप डाउनलोड

निवडणुकीपूर्वी मोदी बरेच होते, पण देशाचे ‘खरे’ झाले काय? : शिवसेना

मुंबई : काल कर्नाटक निवडणुकीतील प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर केलेल्या टीकेचा संदर्भ घेत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना मधून नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटक निवडणुकीदरम्यान पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तर दिली होती. त्यातील एक प्रश्न हा पंतप्रधान पदाचे उमेदवार असा होता त्यावर उत्तर देताना राहुल गांधींनी पंतप्रधान पदाची इच्छा व्यक्त केली होती. परंतु त्यावर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली होती. परंतु नरेंद्र मोदी यांनी टीका करताना राहुल गांधींना आघाडी धर्माची आठवण करून दिल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून नरेंद्र मोदींवर टीका करत, त्यांना युती धर्माची आठवण करून देताना बोचरी टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी ‘युपीए’मधील घटक पक्षांची चर्चा किंव्हा विचार विनिमय न करता स्वतःच परस्पर पंतप्रधानपदासाठी उमेदवारी जाहीर करायची हे म्हणजे युपीए’मधील इतर सर्व पक्षांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखेच आहे अशी परखड ‘मन की बात’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडली, परंतु नरेंद्र मोदींनी केलेला हा सर्व प्रकार म्हणजे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ अशाच थाटाचा आहे. अगदीच संसदीय आणि स्वच्छ भाषेत समजवायचे तर ‘स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून’ असाच प्रकार म्हणता येईल,’ असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधून नरेंद्र मोदींना हाणला आहे.

काँग्रेस पक्षात आणि यूपीए मध्ये अनेक ज्येष्ठ लोक रांगेत असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदाची उमेदवारी परस्पर कशी काय जाहीर करू शकतात हा नरेंद्र मोदींचा आजचा प्रश्न आहे. परंतु मोदींच्या या प्रश्नाचे उत्तर भाजमधील ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी अशा वरिष्ठ आणि बुजुर्ग मंडळींनीच द्यायला हवे असा खोचक टोला नरेंद्र मोदींना लगावला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Saamna(3)#Sanjay Raut(101)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x