मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज ६ वा स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून हजारो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी दादर शिवाजी पार्क इथल्या शिवतीर्थावर एकत्र आले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन सहकुटुंब आदरांजली वाहणार आहेत. दरम्यान, स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून स्मृतिस्थळावर मोठी तयारी करण्यात आली आहे. शिवसैनिकांसोबत अनेक पक्षातील राजकीय नेते सुद्धा बाळासाहेबांच्या आठवणी सांगतात आणि आजही भावुक होतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बाळासाहेबांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे.

तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक व्हिडिओ प्रसिद्ध करून सत्ताकाळात नाशिकमध्ये उभारलेल्या भव्य हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि स्वर्गीय. बाळासाहेबांप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्यात आलं आहे.

today is balasaheb thackerays sixth death anniversary