24 September 2020 11:25 PM
अँप डाउनलोड

पोलखोल व्हिडिओ; २००९ मध्ये राम मंदिर मुद्दा महत्वाचा नव्हता, पण सत्तेत आल्यावर विकास फसताच राम मंदीर?

मुंबई : सध्या देशात भाजप आणि शिवसेनेच्या राजवटीत महागाईने शिखर गाठलं असताना शेतकरी आत्महत्या, जलयुक्त शिवार आणि शिवजल योजनांचं ग्रामीण भागाला मृगजळ दाखवून पुन्हा तीव्र दुष्काळ जाहीर करण्याची आलेली वेळ, पेट्रोल-डिझेलचे वाढणारे भाव, डॉलरच्या तुलनेत कोसळणारी रुपयाची किंमत या सर्व विषयांपासून सामान्य लोकांना विचलित करण्यासाठी सगळं ठरवून सुरु आहे अशी परिस्थिती आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कारण, २०१९ च्या निवडणूका ना भाजपला पोषक दिसत आहेत आणि नाही शिवसेनेला सुद्धा. दरम्यान २०१४ मध्ये विकासाची स्वप्नं दाखवत सत्तेत आलेल्या भाजप आणि शिवसेनेचा विकासाचा कार्यक्रम पूर्ण फसल्याने भाजप आणि शिवसेनेने धार्मिक राजकारण सुरु करून राम मंदिराच्या नावाने बोंब सुरु केली आहे. त्यात शिवसेनेच्या डझनभर मंत्र्यांनी नेमका काय विकास केला आणि ते राज्यातील जनतेसाठी किती विकासाची कामं करतात याची पोलखोल त्यांच्याच आमदाराने सर्वांदेखत केली आहे. त्यामुळे राम मंदिराची निवडणुकीपूर्वी सर्वाधिक घाई शिवसेनेला होणे साहजिकच आहे.

त्यामुळे राम मंदिराच्याबाबत २००९ मध्ये एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना हिंदुत्वाच्या भूमिकेवरून राम मंदिराच्या मुद्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. दरम्यान त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी इतर महत्वाच्या विषयांचा पाढा वाचला होता आणि ते अधिक महत्वाचं असल्याचं म्हटलं होत. सध्या सत्तेत असलेली शिवसेना विकासाच्या मुद्यावर पूर्ण अपयशी ठरल्याने राम मंदिराचा भावनिक मुद्दा पुढे करून जनतेच केंद्रातील एनडीए सरकारच्या काळातील आणि युती सरकारच्या काळातील वाढलेली महागाई, शेतकरी आत्महत्या, जलयुक्त शिवार आणि शिवजल योजनांचं ग्रामीण भागाला मृगजळ दाखवून पुन्हा तीव्र दुष्काळ जाहीर करण्याची आलेली वेळ, पेट्रोल-डिझेलचे वाढणारे भाव, डॉलरच्या तुलनेत कोसळणारी रुपयाची किंमत या सर्व विषयांपासून सामान्य लोकांना विचलित करण्यासाठी सगळं ठरवून करत असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे.

त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असलेल्या राम मंदिरा विषयी आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराचा भावनिक मुद्दा पुढे करून लोकांची माथी भडकविण्याचे प्रकार सुरु असल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये रंगली आहे. त्यामुळे देशातील तरुणांचे, महिलांचे आणि शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न वेगळेच असताना, आणि ते मुद्दे भाजप-शिवसेनेच्या राजवटीत अधिक भयानक झाल्याने राम मंदिराचा मुद्दा पुढे करून संपूर्ण विषय निवडणुकीच्या काळात राम मंदिरावर केंद्रित करून इतर प्रश्नांना बगल दिली जाईल अशी रणनीती आहे.

व्हिडिओ: २००९ मधील राम मंदिराबाबत संजय राऊतांची अधिकुत प्रतिक्रिया आणि २००१९ मधील निवडणुकीसाठी राम नामाचा जाप असं चित्र आहे. त्यामुळे अशा प्रतिक्रिया बघून सामान्यांनीच विचार करायला हवा की आपल्या मूळ समस्या काय आहेत?

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Shivsena(921)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x