मुंबई : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यावर आहेत. राज ठाकरे यांनी शहरी भागांसोबतच ग्रामीण महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले असून पक्षविस्तार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे त्यांच्या दौऱ्यामागील मूळ उद्देश असल्याचे समजते.

दरम्यान मनसे अध्यक्ष यावेळी पूर्व आणि पश्चिम विदर्भात मनसेचे जाळे अधिक घट्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी मनसेतर्फे काही मतदारसंघांवरच विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या २ विधानसभा मतदारसंघात मनसे मोठी मुसंडी मारण्याची शक्यता आहे असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे मनसे अध्यक्षांच आगमन वणी येथे होताच कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत देशभरात मोदी लाट असताना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसारखे पक्ष समोर असताना सुद्धा वणी व हिंगणघाट या दोन मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे विदर्भातील काही निवडक मतदारसंघावर राज ठाकरे विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पूर्व आणि पश्चिम विदर्भात अनेक मतदारसंघात टक्कर देऊ शकतील अशा संभाव्य उमेदवारांना भेटण्यासाठी हा दौरा असल्याचे समजते. राजु उंबरकर हे मनसेचे वणी मतदारसंघातील तांगडे उमेदवार असतील आणि आगामी निवडणुकीत सर्वांना चितपट करतील असं पोषक वातावरण आहे. राज ठाकरे स्वतः आज कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाला आणि राजू उंबरकर यांना तयारीला लागण्याचे आदेश देतील वृत्त आहे. प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाल्यावर मनसे अध्यक्षांच्या सभेने संपूर्ण वातावरण बदलेल आणि राजू उंबरकर यांचा विजय निश्चित होईल, अशी खात्री स्थानिक महाराष्ट्र सैनिकांना आहे.

पूर्व विदर्भातील अनेक शिवसैनिक व इतर मोठ्या पक्षातील नाराज नेते आणि पदाधिकारी मनसेमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे समजते. दरम्यान, भाजप आणि शिवसेनेबद्दल सत्ताकाळाच्या अनुभवावरून एक रोष पाहायला मिळत आहे आणि काँग्रेस – राष्ट्रवादी सुद्धा काही विशेष सुस्थितीत आहेत असं नाही आणि त्याचा थेट फायदा मनसेला होऊ शकतो अशी शक्यता आहे. त्यामुळे मनसे ज्या अर्थी विदर्भावर सुद्धा मोठ्या आशेने लक्ष केंद्रित करत आहे आणि त्यानुसार मनसे शहरी भागात सुद्धा चांगला निकाल देतील, असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

MNS Cheif Raj Thackeray on Tour of Vani constituency and huge crowed of party workers gathered at place