30 May 2023 1:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | पाच स्वस्त पेनी शेअर्स! एका महिन्यात पैसा गुणाकारात वाढतोय, स्टॉक लिस्ट पहा Redmi Note 12T Pro | 64 MP कॅमेरा आणि 144Hz डिस्प्ले, Xiaomi चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, किंमत आणि फीचर्स पहा Symphony Share Price | कुलर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 3,00,000 टक्के परतावा दिला, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 30 कोटी, स्टॉक डिटेल्स Money Saving Tips | पैसे हाताशी थांबत नाहीत का? फॉलो करा या 8 टिप्स आणि आयुष्यातील आर्थिक बदल पहा शिंदे गट धोक्यात! आज निवडणूक झाल्यास शिंदे यांच्या शिवसेना गटाला केवळ 5.5% मते मिळतील, मनसे सर्वेतही शिक्कल नाही - सर्वेक्षण रिपोर्ट Adani Enterprises Share Price | 1 महिन्यात अदानी एंटरप्रायझेस शेअरने 32% परतावा दिला, अदानी स्टॉक तेजीत, ब्लॉकडीलची जादू काय आहे? Axita Cotton Share Price | सुवर्ण संधी! एक्झीटा कॉटन कंपनी 28 रुपयाचा शेअर 56 रुपयांना बायबॅक करणार, रेकॉर्ड डेटच्या आधी फायदा घ्या
x

Loksabha Election 2024 | दिल्लीत शरद पवार आणि नितीश कुमार यांची भेट, मोदी-शहांचा मार्ग खडतर होतोय

Loksabha Election 2024

Loksabha Election 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भेट घेतली आहे. ही भेट मंगळवारीच होणार होती. मात्र आज काही वेळापूर्वीच ती भेट झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. मोदी आणि शाह यांना टक्कर देण्यासाठी शरद पवार हे विरोधकांची आघाडी उभी करण्याची तयारी करत आहेत का या चर्चा या भेटीमुळे सुरू झाल्या आहेत.

एनडीएतून बाहेर पडल्यानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यानंतर नितीश कुमार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार हे विरोधी पक्षांची मोट बांधत आहेत. यामुळे आज नितीश कुमार यांनी घेतलेली भेट लक्षवेधी ठरली आहे. भाजप विरोधात मोहिम आखण्यासाठी शरद पवार देशभरातील विरोधी पक्ष नेत्यांची फळी उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. या आधी राहुल गांधींनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यासोबतच विरोधी पक्षातील जे महत्त्वाचे नेते आहेत शरद पवार यांची भेट घेत आहेत.

नितीश कुमार यांनी बिहारमध्ये जो प्रयोग केला तो सगळ्यांना परिचित आहेच. त्यांनी भाजपला बाजूला केलं आणि राजदसोबत जात सरकार स्थापन केलं. नितीश कुमार त्यानंतर दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी अऱविंद केजरीवाल, मुलायम सिंग यादव या नेत्यांची त्यांनी भेट घेतली. मुलायम सिंग यांच्यासोबत एक तास नितीश कुमारांची चर्चा झाली. मोदींविरोधात पंतप्रधान पदाचा प्रबळ दावेदार निवडण्याबाबत अद्याप विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये एकमत झाले नसले तरी मोदींना पाय उतार करण्याचा प्लान विरोधी पक्ष आखत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Loksabha Election 2024 Bihar CM Nitish Kumar meet NCP President Sharad Pawar 07 September 2022.

हॅशटॅग्स

#Loksabha Election 2024(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x