14 December 2024 12:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE
x

नगर निवडणूकः भाजपा-एनसीपी'ची खेळी, शिवसेनेला धोबीपछाड, महापौर भाजपचा

नगर : सकाळी अकरा वाजता महापौर निवडीची सभा पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडण्यास सुरुवात झाली. शिवसेनेच्या २४ नगरसेवकांपैकी २३ नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. तर सपा नगरसेवकांनी शिवसेनेला पाठींबा दिला. सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला एकूण ०८ मते मिळाली तर एनसीपीचे महापौर पदाचे उमेदवार संपत बारस्कर, अविनाश घुले, नज्जू पहिलावान हे नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे महापौर पदाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांच्यासोबतच महापालिकेत हजर झाले.

त्याचवेळी एनसीपी आणि भारतीय जनता पक्षासोबत असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आले. दरम्यान, सभागृहात महापौर पदासाठी एनसीपी’कडून उमेदवारी दाखल केलेल्या नगरसेवक संपत बारस्कर यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे वाकळे आणि शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे असे २ उमेदवार अखेर रिंगणात उरले होते.

वाकळे यांना एकूण ३७ मतं मिळाली. त्यात भाजपचे १४, एनसीपीची १८, बसपा ०४ तर अपक्ष ०१ अशा मतांचा समावेश आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे बोराटे यांना एकूण ०८ इतकी मते मिळाली. तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमचे मत शिवसेनेच्या कोट्यात मोजण्यात आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x