15 May 2021 8:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

भाजपच्या उपमहापौरांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य.

अहमदनगर : भाजपच्या उपमहापौरांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने पक्षाने त्यांना बडतर्फ केले आहे. उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी अखंड महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं असून, त्यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

श्रीपाद छिंदम यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर फिरत असून, त्या क्लिपमुळे अहमदनगर शहरात प्रचंड तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे. श्रीपाद छिंदम हे भाजपचे अहमदनगरचे उपमहापौर आहेत.

या ऑडिओ क्लिप मध्ये श्रीपाद छिंदम हे बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांच्या बरोबर संभाषण करत आहेत, त्या संभाषणादरम्यान श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांबद्दल चुकीचे अपशब्द वापरल्याचा आरोप अशोक बिडवे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी तक्रारही दाखल केली आहे.

अहमदनगर मध्ये राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नैतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. तर शिवसेनेकडून श्रीपाद छिंदम यांचा पुतळा जाळण्यात आला. या ऑडिओ क्लिप मुले अहमदनगर मध्ये तणावाचे वातावरण आहे.

हॅशटॅग्स

#Shivaji Maharaj(3)BJP(438)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x