13 July 2020 7:07 AM
अँप डाउनलोड

शरद पवारांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं ? सुधीर मुनगंटीवार

BJP MLA Sudhir Mungantiwar, NCP President Sharad Pawar, Aaj Ke Shivaji Narendra Modi

मुंबई: ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून राजकीय वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं भारतीय जनता पक्षाला टीकेला सामोरं जावं लागत आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यातील माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यावर स्पष्टीकरण देत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली जाणता राजा ही उपाधी शरद पवार यांनाही दिली जाते. पवारांच्या कार्यकाळात अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळं त्यांना जाणता राजा ही उपाधी लागू होते का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

यावेळी त्यांनी ‘आज के शिवाजी’ या पुस्तकावरुन पक्षाची भूमिका मांडली. जोपर्यंत ब्रम्हांड आहे तोपर्यंत शिवरायांची तुलना होऊ शकत नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं. “जाणता राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वापरली जाणारी उपमा आहे. ती उपमा शरद पवार यांच्यासाठी सर्रास वापरली जाते. ते तुम्हाला चालते. इंदिरा गांधी यांना ‘इंदिरा इज इंडिया’ असं म्हटलं गेलं आहे. तेही तुम्हाला मान्य आहे,” अशी आठवण त्यांनी विरोधकांना करुन दिली.

विरोधकांनी भाजपवर एकच हल्लाबोल केला असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे ही केवळ चमचेगिरी असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे. या प्रकरणात पंतप्रधानांना दोष देता येणार नाही. कारण कदाचित याबाबत त्यांना कल्पना नसावी, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले आहे.

 

Web Title:  Aaj Ke Shivaji Narendra Modi BJP MLA Sudhir Mungantiwar asks questions to opposition leaders over NCP President Sharad Pawar known as a Janta Raja.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sudhir Mungantiwar(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x