11 December 2024 6:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
x

अर्थ मंत्रालयासह कृषी अशी थेट जनतेशी संबंधित आणि स्वत:चा बजेट असलेली खाती अजित पवार गटाकडे, शिंदे गटाचा पूर्ण गेम झाल्याची चर्चा

Ajit Pawar Camp

Ajit Pawar | शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गटाचा प्रवेश होऊनही बारा दिवस झाले तरी कोणतीही खाती मिळालेली नाहीत. मात्र, आज (14 जुलै) अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना त्यांची खाती मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे. खातेवाटपाची यादी ही आता नुकतीच राजभवनाकडे गेली असून आता राज्यपालांचा त्यावर सही होणं फक्त बाकी आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, अजित पवार त्यांच्या नऊही आमदारांना अनेक चांगली खाती मिळालेली आहेत. पण याचा सर्वाधिक फटका हा मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेतील मंत्र्यांनाच बसल्याचं पाहायला मिळतं आहे. विशेष म्हणजे यावेळी भाजपच्या श्रेष्ठींनी शिंदे गटाला विचार तरी घेतलं का असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कारण सर्वच बाजूने अजित पवार गटाला झुकतं माप देण्यात आल्याचं स्पष्ट झालंय.

अर्थ खातं आणि इतर महत्वाची खातीही अजित पवार गटाकडे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांनाच अर्थ खातं देण्यात आलं आहे. तसेच सहकार, सामाजिक न्याय, महिला व बालकल्याण, अन्न आणि नागरी पुरवठा ही भाजपकडील खातीही राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडील कृषी आणि अल्पसंख्यांक खातंही मिळवण्यात अजित पवार यशस्वी झाल्याचं माहिती आहे. शिंदे गटाचे आमदार आणि नेते अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खातं राष्ट्रवादीला देण्यात आलं आहे. त्यामुळे सत्तार हे काय करणार? असा सवाल करण्यात येत आहे. सत्तार हे राजीनामा देणार की मंत्रिपदावर कायम राहणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अजित पवार यांच्या गटाला अत्यंत महत्त्वाचीच खाती मिळाली आहे. अर्थ, सहकार, कृषी, अल्पसंख्यांक, सामाजिक न्याय, अन्न व नागरी पुरवठा तसेच महिला व बालकल्याण आदी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहेत. या खात्यातील अनेक खात्यांना स्वत:चा बजेट आहे. शिवाय यातील काही खाती तर थेट जनतेशी संबंधित आहेत. त्यामुळे पक्ष वाढवण्यासाठी या खात्याचा अजित पवार गटाला चांगलाच फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना मिळाली ‘ही’ खाती

1. अर्थ
2. सहकार
3. कृषी
4. महिला व बालकल्याण
5. मदत व पुनर्वसन
6. वैद्यकीय शिक्षण
7. क्रीडा
8. अन्न व नागरी पुरवठा
9. अन्न आणि औषध प्रशासन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांना कोणती खाती मिळाली?

* अजित पवार – अर्थ
* धनंजय मुंडे – कृषी
* दिलीप वळसे पाटील – सहकार
* हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
* छगन भुजबळ – अन्न नागरी पुरवठा
* धर्मराव अत्राम – अन्न आणि औषध प्रशासन
* अनिल भाईदास पाटील – क्रीडा
* अदिती तटकरे – महिला आणि बालकल्याण
* अनिल पाटील – मदत आणि पुनर्वसन
*  संजय बनसोडे – सामाजिक न्याय

News Title : Ajit Pawar Camp got good portfolio in State government check details on 14 July 2023.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar Camp(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x