13 May 2021 9:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन निवडणूकीत भाजप विजयी तर सेनेचा सुपडा साफ, मनसेचे यशवंत किल्लेदार सुद्धा विजयी

मुंबई : काल पार पडलेल्या डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर व शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत स्व.रघुवीर सामंत पॅनेलने विजय मिळवला तर शिवसेनेचा सुपडा साफ झाला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचा सुपडा साफ झाला असताना मनसेचे यशवंत किल्लेदार मात्र विजयी होऊन पॅनेलवर गेले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भाजपपुरस्कृत पॅनेलने शिवसेनेच्या शिवप्रेरणा पॅनेलचा धुव्वा उडवला आहे, अशी माहिती आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रसार माध्यमांना दिली. रविवारी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात ही निवडणूक पार पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. तरी, शिवसेनेला या निवडणुकीत साधे खाते सुद्धा उघडता आले नाही हे विशेष आहे.

दरम्यान मुंबईतील या निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव झाल्याने त्याचे पडसाद आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळू शकतात असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1081)BJP(438)MNS(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x