9 October 2024 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर पुन्हा रॉकेट होणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Aditya Birla Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना 3200 बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
x

डोंबिवलीत भाजप नगरसेवकाविरोधात विनयभंगाची तक्रार | भाजपकडून अजून अधिकृत प्रतिक्रिया नाही

Complaint of molestation

डोंबिवली, १४ सप्टेंबर | कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि माजी भाजप नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करण्यात आली आहे. कल्याणमधीलच एका समाजसेविका महिलेनं ही तक्रार केली आहे. या प्रकरणी भाजपच्या वरिष्ठांकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

डोंबिवलीत भाजप नगरसेवकावर विनयभंगाची तक्रार आरोप, भाजपकडून अजून अधिकृत प्रतिक्रिया नाही – Complaint of molestation against BJP corporator in KDMC :

भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधित महिलेला अश्लील मेसेज पाठवले, तसंच धमकी दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. याबाबत किरीट सोमय्या यांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी कुणी काही चूक केली असेल तर त्याच्या विरोधात कायद्यानुसार चौकशी आणि कारवाई झाली पाहिजे, असं सोमय्या यांनी वरवरचे उत्तर देत अधिक बोलणं टाळलं.

चित्रा वाघ यांच्या प्रतिक्रिया येणार का?
दरम्यान, महिला विषयक गुन्हांमध्ये भाजपाच्या महिला पदाधिकारी चित्रा वाघ या त्यांची प्रतिक्रिया देत असतात. असं असलं तरी अद्याप तरी त्यांनी या विषयावरून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्या यावर प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जातेय. त्यानंतर सत्ताधारी देखील हल्लाबोल करतील अशी देखील शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Complaint of molestation against BJP corporator in KDMC.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x