20 September 2024 6:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकरांचा चंद्रपूरात शिवसेनेला धक्का | सेनेच्या ७ नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

MP Balu Dhanorkar

चंद्रपूर, १४ सप्टेंबर | चंद्रपूरमध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता. कारण शिवसेनेचे ७ नगरसेवक काँग्रेसनं फोडले आहेत. वरोरा नगरपरिषदेतल्या ७ नगरसेवकांनी शिवबंधन सोडून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकरांचा चंद्रपूरात शिवसेनेला धक्का, सेनेच्या ७ नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश – Seven Shivsena corporators join congress in Chandrapur in presence of congress MP Balu Dhanorkar :

महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूरात सेनेला धक्का दिला आहे. विशेष म्हणजे धानोरकर याआधी शिवसेनेतच होते. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि खासदार झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी वरोरा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाल्या. वरोरा आणि भद्रावतीमध्ये धानोरकर यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे भद्रावतीमधील शिवसेनेची सत्ता धोक्यात आली आहे.

वरोरा नगर परिषदेतील शिवसेनेचे ७ नगरसेवक धानोरकर यांनी फोडले. याशिवाय भद्रावती नगर परिषदेतील शिवसेनेच्या १२ नगरसेवकांचा पक्षप्रवेशदेखील आजच संपन्न होणार होता. मात्र शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रशांत कदम भद्रावतीमध्ये तळ ठोकून बसले. नगरसेवकांचा पक्षप्रवेश रोखण्यासाठी त्यांनी जवळपास ४८ तास सूत्रं हलवली. अखेर त्यांना पक्षप्रवेश रोखण्यात यश आलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Seven Shivsena corporators join congress in Chandrapur in presence of congress MP Balu Dhanorkar.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x