नागपूर: PPE किट घालून तुकाराम मुंडेंनी थेट कोरोना रुग्णांशी संवाद साधला

नागपूर, २१ जुलै : कोरोना महामारीवरील उपाययोजना ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असून ती लोकांना विश्वासात घेऊनच करावी लागणार आहे. टाळेबंदी हा त्यावर पर्याय असू शकत नाही. जिल्ह्य़ात आता टाळेबंदी लावल्यास शेतीच्या हंगामावर परिणाम होऊ शकतो, असे नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले. रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेने तसे संकेतही दिले आहेत.
दुसरीकडे कोरोना थैमानाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकतीच शासकीय मेडिकल रुग्णालयात व इंदिरा गांधी शासकीय कोविड रुग्णालयात भेट दिली. नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी ३००० चा आकडा पार केला आहे. नागपुरात काल आणखी ६८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर नागपूरच्या कामठी तालुक्यात पुन्हा १३ रुग्ण आले पॉझिटिव्ह आढळले आहेत.
नागपुर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनात संघर्ष होत असल्याचंही चित्र आहे. तुकाराम मुंढे हे आपल्या धडक कारवाईसाठी ओळखले जातात. कोरोना रुग्णांची भेट घेतल्यानंतरही तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला ताबोडतोब आदेश दिले.
तुकाराम मुंढे यांनी स्वतः PPE KIT घालून आयसोलेशन वार्डात जावून रुग्णांशी संवाद साधला. येथील परिस्थितीचा आढावा घेत संबंधितांना सूचना व दिशानिर्देश दिले. यावेळी स्वतः तुकाराम मुंढे यांच्यासह डॉक्टर अविनाश गावंडे आणि डॉ.फैजल उपस्थित होते. शहरात कोरोना संक्रमण वेग वाढत असताना आयुक्त तुकाराम मुंढे आक्रमक झाले आहेत. मुंढे यांनी शहरातील रस्त्यांवर उतरत कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली. तसंच गांधीबाग झोनमध्ये कोविडबाबतच्या दिशानिर्देशाचे पालन न करणारऱ्यांना समज दिल्याचं पाहायला मिळालं.
News English Summary: On the backdrop of Corona Thaimana, Nagpur Municipal Commissioner Tukaram Mundhe recently visited Government Medical Hospital and Indira Gandhi Government covid Hospital.
News English Title: Nagpur Coronavirus Tukaram Munde wear a PPE kit and interacted directly with corona patients News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
ED Vs Xiaomi | शाओमी कंपनीचा ईडीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकावल्याचा गंभीर आरोप
-
ICICI Pru Guaranteed Pension Plan Flexi | आयसीआयसीआयचा प्रू गॅरंटीड पेन्शन प्लॅन फ्लेक्झी लाँच | डिटेल्स जाणून घ्या
-
Intraday Stocks For Today | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Multibagger Stock | 2 वर्षात 200 टाके परतावा देणारा शेअर | हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Intraday Stocks For Today | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Two Wheeler Loan | ड्रीम बाइक खरेदी करण्यासाठी टू-व्हीलर लोन घ्यायचा आहे? | त्यावेळी या गोष्टी लक्षात ठेवा
-
Multibagger Stocks | जबरदस्त शेअर्स | घसरणाऱ्या बाजारात देखील या 5 शेअर्सचे गुंतवणूकदार मालामाल
-
Rainbow Children's Midcare IPO | रेनबो चिल्ड्रन मिडकेअरचा शेअर उद्या लिस्ट होणार | तज्ज्ञ काय सांगतात?
-
Stocks To Buy Today | या 5 शेअर्समधून 1 आठवड्यात कमाईची मोठी संधी | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला