मुंबई : दोन दिवसांपूर्वी लागू झालेल्या प्लास्टिक बंदीच इतरांप्रमाणे मनसेने सुद्धा समर्थन केलं, परंतु प्लास्टिकला पर्यायी व्यवस्था आणि दंडाची रक्कम अशा त्रुटींवर मनसेकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्याला अनुसरून पर्यावरण मंत्री रामदास कदमांनी ही विसंगत प्रतिक्रिया दिली आहे.
मनसेने उपस्थित केलेल्या त्रुटींवर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी प्रश्न उपस्थित केला की,’मला राज ठाकरेंना विचारायचंय की, काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटायला लागली? परंतु रामदास कदमांनी अशी प्रतिक्रिया दिल्यावर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित हसू स्पष्ट पणे दिसत होत.
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना रामदास कदम म्हणाले की, काल काही पक्षांनी राज्यातील प्लास्टिक बंदीबाबत काही मागण्या केल्या. प्लास्टिकबंदी मान्य, पण प्लास्टिकला पर्याय द्या आणि आकारलेली दंडाची रक्कम सुद्धा जास्त आहे, असे अनेक आक्षेप घेतले आहेत. पण मला राज ठाकरेंना विचारायचं आहे की, काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटायला लागली? युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतल्यामुळेच मनसेकडून विरोध होतो आहे., असे पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले.
विशेष म्हणजे संबंधित खात्याचे मंत्री असून सुद्धा त्रुटी आणि उपाय योजनांवर उत्तरं द्यायची सोडून काही वेगळीच प्रतिक्रिया दिल्याने प्रसार माध्यमांच्या उपस्थित प्रतिनिधींमध्ये वेगळीच कुजबजु सुरु झाली होती. आता यावर मनसे कडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणे महत्वाचे आहे.
