25 April 2024 1:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Group IPO | पैसे तयार ठेवा! टाटा गृपचा IPO येतोय, मालामाल होण्याची मोठी संधी, डिटेल्स जाणून घ्या My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

पावसाने मुंबईची 'तुंबई' झाल्यावर सत्ताधाऱ्यांचे एकमेकांवर दोषारोप

मुंबई : मुंबई शहरातील पहिल्याच पावसाने जागोजागी पाणी तुंबल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते सुद्धा दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा सुद्धा खोळंबा उडाला आहे. त्यातच जवाबदारी घेण्याऐवजी मुंबई महानगर पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजप एकमेकांवर दोषारोप करण्यात गुंतले आहेत.

मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनाही शिवसेनेवर हल्लबोल केला आहे. प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’ असं म्हणण्याची वेळ आली आहे, कारण जवाबदारी घेण्याऐवजी जवाबदारी झटकण्याचे प्रकार महापौर विश्वनाथ महाडेश्वरांन कडून होत आहे असं आशिष शेलार म्हणाले.

मुंबई शहरात काल पासून होणाऱ्या तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक जण आज शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केंद्रापर्यंत पोहचू शकलेले नाहीत. परंतु आशिष शेलार यांनी उद्भवलेल्या परिस्थितीला शिवसेनेला लक्ष करत असं विधान केलं की,’मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही. ‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी पावसानंतर ‘पळून दाखवलं’ असच म्हणावं लागेल.

विशेष म्हणजे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना मुंबईतील परिस्थिती उघड्या डोळ्याने दिसत नसावी अशी प्रतिक्रिया दिली आहे. पावसामुळे संपूर्ण मुंबईभर पाणी तुंबले असताना महापौरांना मुंबईमध्ये पालिकेच्या कामामुळे कुठेच पाणी तुंबल्याचं दिसत नाही असं वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे. महापौर असं सुद्धा म्हणाले की, ‘मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचलं मात्र तुंबलेलं नाही’.

त्यामुळे आता सत्ताधारी जवाबदारी स्वीकारण्याऐवजी एकमेकांवर केवळ आरोप करण्यात वेळ काढतील अशी परिस्थिती आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x