मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली. मुलाखती दरम्यान पवारांनी भाजप विरोधातील महाआघाडी, शिवसेनेचा स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाबत अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली.
महाआघाडीच्या नैतृत्वाबद्दल पवारांना विचारे असता ते म्हणाले की, प्रथम भारतीय जनता पक्षाचा पराभव हे आमचं अंतिम लक्ष आहे. तसेच निवडणुकीनंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे पाहावे लागेल, कारण प्रत्येक राज्यात राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे. सर्व जागांचा अंदाज घेऊन मग एकत्र बसून निर्णय घेतला जाईल असं पवार म्हणाले. प्रश्नाचा मुख्य रोख हा राहुल गांधी यांच्या नैतृत्वाखाली असेल का असा होता. परंतु पवारांनी त्याला उत्तर देताना म्हटले कि, लोकसभा निवडणूकीनंतर सर्व पक्षांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आत्ताच कुणाचं नाव कशासाठी घ्यायचं आणि तो नैतृत्व करणारा चेहरा कोणाचा असेल ते निवडणूकीनंतर बघू असं पवार म्हणाले.
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर बोलताना पवार म्हणाले की, राज्यात भाजप विरोधात राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप, डॉ. आंबेडकरांच्या विचारांना मानणारे पक्ष एकत्र असे सर्व पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्नं करणार आहोत. राज्याला स्थिर सरकार द्यावं हा मूळ उद्देश असेल असं पवार म्हणाले.
शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना संदर्भातील प्रश्नांना पवारांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली की, सध्या शिवसेनेचा मूळ उद्देश हा संघटना वाढविणे हा दिसत आहे. त्यामुळे ते आगामी निवडणूक स्वबळावर लढतील असं वाटत आणि त्याच्या स्वबळाची भूमिकेत ते बदल करणार नाहीत असा त्यांचा स्वभाव आहे असं पवार म्हणाले. तसेच राज ठाकरे यांच्या बद्दल पवार म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका ही ठरलेली आहे. राज ठाकरे यांचा भारतीय जनता पक्षाला कडवा विरोध आहे. तसेच स्पष्ट भूमिका घेणे हे राज ठाकरे यांचे वैशिष्ठ आहे आणि ते त्याच मार्गावर ठाम राहून जातील अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी शिवसेना आणि मनसे संबंधित विचारलेल्या प्रश्नावर दिली.
