मुंबई : मुंबई शहरात काल पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अनेक नैसर्गिक धक्के बसायला सुरुवात झाली आहे. तसाच प्रकार वडाळ्यातील अँटॉप हिल येथे संरक्षक भिंत खचल्याने मोठं नुकसान झालं आहे.
आज पहाटे दोस्ती पार्क इमारती जवळील रस्ता पावसामुळे खचल्याने इमारतीची संरक्षक भिंत कोसळून या दुर्घटनेत ७ गाड्यांचे नुकसान झाल्याचे समजते. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी स्थानिक नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाबाबतच स्थानिक लोक प्रश्न उपस्थित करून संताप व्यक्त करत आहेत. संपूर्ण रस्ताच खचल्याने गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तसेच संपूर्ण रस्त्याला मोठं मोठे खड्डे पडल्याचे स्पष्ट दिसत आहे.
