7 July 2020 8:26 PM
अँप डाउनलोड

मराठी नाट्यसंमेलन, उद्घाटन राज ठाकरे करतील आणि समारोप उद्धव ठाकरे

मुंबई : १३ जूनला ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे. कालच नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर या निवासस्थानी भेट घेऊन तसं निमंत्रण सुद्धा दिल आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

विशेष म्हणजे ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलच्या आयोजकांनी एक अचूक मेळ आणि समतोल साधला आहे. कारण या संमेलनाचे उद्घाटन राज ठाकरे, शरद पवार आणि ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोपाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

१३ जूनपासून मुलुंडमध्ये हे ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन सुरू होत आहे. परंतु इथे चर्चा रंगली आहे ती, नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी नुकतेच विराजमान झालेल्या प्रसाद कांबळी यांनी, आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच होत असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनासाठी चांगलीच राजकीय मुत्सद्दी आणि चतुराई दाखवली आहे त्याचीच. कारण त्यामुळे उद्घाटनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि समारोपाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे असा अचूक समतोल आयोजकांनी या संमेलनात साधला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x