26 October 2021 5:43 AM
अँप डाउनलोड

युवासेनेची नाराजी भोवली, डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीवर युवासेनेतून आवाज बुलंद होण्याआधीच घडामोडींना वेग आला होता. अखेर शिवसेनेचे बोरिवलीचे विभागप्रमुख विलास पोतनीस यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून होणाऱ्या निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आहे. आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या कार्यशैलीवर अनेक युवा सैनिक नाराज होते तसेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतील यश संपादन केल्यानंतर अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यातच मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागल्याने अनेकांनी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली होती. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे विधानपरिषदेमार्फत मंत्रिमंडळात सामील झाले होते. परंतु यंदा युवा सेनेच्या दबावामुळे त्यांचा पत्ता कात झाला असून बोरिवलीचे विभागप्रमुख विलास पोतनीस यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून होणाऱ्या निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आहे.

त्यानंतर त्यांनी ताबडतोब ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केला. नंतर डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. युवासेनेच्या दबावामुळे डॉ. दीपक सावंत यांना पायउतार व्हावं लागलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1152)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x