29 May 2022 5:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
x

आणि 'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच, मनसेचे नेते अभिजित पानसे करणार दिग्दर्शन!

मुंबई: स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बायोपिकचा टीझर आज म्हणजे गुरुवारी प्रसारित करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, ग्रेट अमिताभ बच्चन यांच्या विशेष उपस्थितत टीझर लाँच करण्यात आला.

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा बाळासाहेबांची भूमिका साकारणार आहे. परंतु दुसऱ्या सिनेमाच्या शुटिंगसाठी तो भारताबाहेर असल्यानं तो या टीझर लाँचिंगला उपस्थित राहू शकला नाही. परंतु त्याच्या अनुपस्थितीत त्याचा एक छोटेखानी भाषणाचा व्हिडीओ दाखवण्यात आला ज्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी थेट मराठीत बोलत होता.

स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरेंच्या बायोपिकसाठी नवाजुद्दीनच्या आधी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अक्षय कुमार आणि अजय देवगन यांचीही नाव चर्चेत होती. परंतु अखेर नवाजुद्दीन यांचाच नाव निश्चित करण्यात आलं.

विशेष म्हणजे हा चित्रपटाच दिग्दर्शन मनसेचे नेते अभिजित पानसे करणार आहेत. आणि हा सिनेमा 23 जानेवारी 2019 रोजी हिंदी आणि मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

हॅशटॅग्स

Balasaheb Thakarey(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x