25 April 2024 6:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

पदवीधर निवडणुकीत यश मिळविणाऱ्या राष्ट्रवादीच्या या आमदाराकडून मंत्रिपदाची मागणी

NCP MLA Satish Chavan, ministry in state government, Graduate constituency election

पुणे, १७ जानेवारी: राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालानंतर (results of 3 graduate and 2 teacher constituencies) सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भारतीय जनता पक्षाला जबरदस्त धक्का बसला होता. कारण, भारतीय जनता पक्षाला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ देखील गमवावा लागला होता. पदवीधरच्या या तिनही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरला होता.

दरम्यान, या निवडणुकीमध्ये सलग ३ वेळा निवडून येत आमदार सतीश चव्हाण यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे. पदवीधर निवडणुकीमध्ये असं यश मिळाल्यानंतर सतिश चव्हाण किंवा मला मंत्री करा अशी स्पष्ट मागणी शिक्षक मतदार संघातील आमदार विक्रम काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे. (NCP MLA Satish Chavan demanded for ministry in state government after success in graduate constituency election)

विक्रम काळे यांनी थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी ही मागणी रास्त असल्याचं म्हटले आहे. अजित पवार, जयंत पाटील आणि पक्ष प्रमुख शरद पवार साहेबांपर्यंत ही मागणी आपण पोहोचवणार असल्याची ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. खासदार सुळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

News English Summary: MLA Satish Chavan has set a record by getting elected 3 times in a row. After such success in the graduate elections, Vikram Kale, MLA from Shikshak constituency, has made a clear demand to NCP leader Supriya Sule to make Satish Chavan or me a minister.

News English Title: NCP MLA Satish Chavan demanded for ministry in state government after success in graduate constituency election news updates.

हॅशटॅग्स

#SupriyaSule(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x