11 December 2024 11:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे! | सेक्युलरवाद्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसला चिमटा

Shivsena, Congress, Aurangabad, Sambhajinagar

मुंबई, १७ जानेवारी: राज्यात सध्या औरंगाबादचं नामंतरण करण्याच्या मुद्दयावर सत्ताधारी पक्षामध्येचं दोन मतप्रवाह असल्याचे दिसत आहे. शिवसेनेने नामांतर करण्याचा विडा उचललाय तर कॉंग्रेस मात्र नामांतरण हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही असे म्हणत या नामांतराच्या विरोधात आहे.काँग्रेसकडून नामांतर विरोधी सूर लावला जात असतानाच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून सेक्युलरवाद्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसला चिमटा काढला आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे.औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे!,” असं म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या कॉंग्रेसला टोले लगावले आहेत.

औरंगजेबाच्या जीवनात कपट, धर्मांधता, अमानुषता ठासून भरली होती. त्याने शिवाजीराजांना शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजींना हाल हाल करून मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे,” असं राऊत यांनी आपल्या सदरात म्हटलं आहे.

 

News English Summary: At present, there are two streams of opinion in the ruling party on the issue of renaming Aurangabad in the state. While the Shiv Sena has taken up the issue of renaming, the Congress is opposed to the renaming, saying it is not at least part of the same program.

News English Title: Shivsena criticised Congress over Aurangabad issue in Saamana Editorial news updates.

हॅशटॅग्स

#Saamana(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x