15 February 2025 2:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Money Alert | प्रायव्हेट नोकरदारांसाठी मोठी बातमी, रु.18000 सॅलरी असणाऱ्यांच्या खात्यात 1,30,35,058 रुपये जमा होणार Loan EMI Alert | कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना 'या' महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल Horoscope Today | शनिवार, 12 राशींचे आजचे राशीभविष्य, मेष आणि तुळ सह या राशींसाठी शनिवारचा दिवस शुभ राहील Shukra Rashi Parivartan | शुक्र अस्त आणि उदय होणार, या 3 नशीबवान राशींच्या नशिबाचा उदय होणार, तुमची राशी कोणती New Income Tax Bill | सावधान, नवीन इन्कम टॅक्स बिलचा थेट तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डवर परिणाम होणार, अपडेट लक्षात ठेवा UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या
x

कंगनावर देशद्रोहाचा खटला दाखल करा | शिवसेना आयटी सेलकडून तक्रार

Shiv Sena IT Cell, Files A Complaint, Kangana Ranaut, Marathi News ABP Maza

ठाणे, 08 सप्टेंबर : बॉलिवुड अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यामध्ये आता रोजच शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे. दरम्यान मुंबई शहराची तुलना पाकिस्तान व्याप्त कश्मीर सोबत केल्यानंतर ट्वीटरवर सेना कार्यकर्ते आणि कंगनामध्ये कलगीतुरा चांगला रंगला आहे. या प्रकरणामध्ये आता शिवसेना आय टी सेल कडून ठाण्याच्या श्रीनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. यामध्ये कंगना च्या मुंबईला POK सोबत तुलना करण्यावरून देशद्रोहाचा आरोप लावत FIR दाखल करण्याबाबत सांगितले आहे.

एएनआय’नं दिलेल्या वृत्तानुसार शिवसेनेच्या आयटी सेलने ठाणे जिल्ह्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा”, असं या तक्रारीत म्हटलं.

कंगना रनौतने मुंबईची पाक व्याप्त कश्मीर सोबत तुलना करत मुंबई मध्ये मला पोलिसांची बॉलिवूड माफियांपेक्षा भीती वाटते. शिवसेना खासदारां संजय राऊत यांनी मला मुंबई मध्ये परतू नकोस अशी खुली धमकी दिली आहे. अशाप्रकारची ट्वीट्स केली होती. त्यानंतर भडकलेल्या शिवसैनिकांनी देखील कंगनाची पोस्टर्स फाडत तिच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. कंगनाने माफी मागावी अन्यथा मुंबईत आल्यानंतर तिचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं आहे.

 

News English Summary: Shiv Sena IT Cell files a complaint at Shrinagar Police Station in Thane against Kangana Ranaut seeking FIR against her under ‘charges of sedition for her Pakistan occupied Kashmir (PoK) analogy for Mumbai’.

News English Title: Shiv Sena IT Cell Files A Complaint Against Kangana Ranaut Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x