13 May 2021 2:23 AM
अँप डाउनलोड

बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं निधन

Bollywood, great Actor Irfan Khan, passes away

मुंबई, २९ एप्रिल: बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. मात्र इरफान यांच्या टीमने ते लढवय्ये असून लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त केली होती. मात्र बुधवारी दिग्दर्शक शूजित सरकारने इरफान यांच्या निधनाचं ट्वीट करत खान कुटुंबियांचं सांत्वन केलं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मागील दोन वर्षांपासून इरफान आजारी होते. २०१८ मध्ये त्यांना न्यूरो इंडोक्राईन ट्यूमरसारखा दुर्धर आजार झाला होता. या दुर्धर आजारावर मात करुन ते पुन्हा चित्रपटसृष्टीत परतले होते. २०१८ मध्ये आजाराचं निदान झाल्यानंतर ते परदेशी उपचारांसाठी गेले होते. या आजारावर यशस्वी मात करुन ते भारतात परतले. तर २०१९ मध्ये त्यांनी ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाचं चित्रीकरणही पार पाडलं होतं. मार्च महिन्यात त्यांचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, मात्र लॉकडाऊनचा फटका या चित्रपटला बसला. थिएटर बंद असल्यानं हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता.

जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी त्याची आई सईदा बेगम यांचं निधन झालं. लॉकडाउनमुळे इरफान आईला शेवटचं पाहायलाही जाऊ शकला नाही. आईचं अंत्यदर्शनही त्याला व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावं लागलं होतं. आईला शेवटचं पाहता आलं नाही ही सल त्याच्या मनात होती.

सलाम बॉम्बे, मकबुल, पान सिंग तोमर, द लंचबॉक्स, हैदर, गुंडे, पिकू, तलवार, हिंदी मीडियम, कारवाँ हे त्यांचे चित्रपट खूपच लोकप्रिय ठरले होते. सलाम बॉम्बे या चित्रपटात पहिल्यांदा त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती.

 

News English Summary: Bollywood actor Irrfan Khan has died at the age of 54. Irrfan Khan was admitted to Kokilaben Hospital in Mumbai. They were placed in the intensive care unit. His sudden demise has shocked his fans all over the world, including Bollywood. English Medium, released in March, was his last film.

News English Title: Bollywood great Actor Irfan Khan passes away in Kokilaben Dhirubhai ambani Hospital in Mumbai News latest Updates.

हॅशटॅग्स

#Film(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x