25 January 2025 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल New Auto Taxi Fare | अच्छे दिन आ गए, बस, रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात मोठी वाढ, इतके पैसे मोजावे लागणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह डिटेल्स जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, चॉइस इक्विटी ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Bigg Boss Marathi | पॅडी दादांनी स्पष्टच सांगितलं, अभिजीत म्हणजे अरबाजचं सॉफ्ट व्हर्जन - Marathi News

Highlights:

  • Bigg Boss Marathi
  • पंढरीनाथ म्हणाले अभिजीत म्हणजे अरबाजचं सॉफ्ट व्हर्जन :
  • जानवीबद्दल म्हणाले हे वाक्य :
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये कॉमेडी स्टार पंढरीनाथ कांबळे यांची एन्ट्री अगदी दिमाखात झाली होती. परंतु फिनालेच्या आठवड्यापर्यंत येताच त्यांना घराची एक्झिट घ्यावी लागली. घरातून एक्झिट घेतल्याबरोबर पॅडी भाऊंच्या अनेक वृत्तवाहिन्यांनी मुलाखती घेतल्या. पंढरीनाथ बरोबरच्या मुलाखती चांगल्याच रंगल्या आणि गाजल्या देखील.

पंढरीनाथ कांबळे यांनी प्रत्येक मुलाखतीमध्ये निक्कीला चांगलंच ट्रोल केलं आहे. त्याचबरोबर पंढरीनाथ यांना निक्की आणि अरबाजच्या नात्याबद्दल विचारल्यावर त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे. पॅडी भाऊंनी त्यांचं स्पष्टच मत मांडलेलं पाहायला मिळतंय. नेमकं काय म्हणाले पॅडी भाऊ पाहूया.

पंढरीनाथ म्हणाले अभिजीत म्हणजे अरबाजचं सॉफ्ट व्हर्जन :

पंढरीनाथ यांनी घराची एक्झिट घेतल्याबरोबर त्यांचे अनेक मुलाखतीचे व्हिडिओज व्हायरल झाले. दरम्यान राजश्री मराठी या वृत्तवाहिनीमध्ये झालेल्या मुलाखतीत पॅडी यांना अभिजीत विषयी काही प्रश्न विचारण्यात आले. अभिजीत सावंत याच्याविषयी सांगताना पंढरीनाथ म्हणाले की,’ अभिजीतने मराठी माणसाचं नाव जगाच्या पटलावर नेऊन ठेवलंय त्यामुळे त्याच्याबद्दल माझ्या मनात रिस्पेक्ट होता. तो जरी माझ्याशी लहान असला तरी, मला त्याला क्रॉस करता यायचं नाही. माझा एक रिस्पेक्ट होता त्याच्याबद्दलचा.

पण नंतर नंतर मी त्याला काही गोष्टी बोलायला लागलो. कारण त्या खूपच खटकत होत्या”. असं पंढरीनाथ म्हणाले. पुढे पंढरीनाथ यांनी अभिजीत बद्दल असं मत दिलं की, अभिजीत सावंत हा दोन्ही बाजूंनी गेम खेळतो. त्याला निकिता मन दुखायला अजिबात आवडत नाही. असं पंढरी यांच्या बोलण्यातून जाणवलं. पुढे मुलाखत सुरू असताना पंढरीनाथ स्पष्टपणे म्हणाले की,”अभिजीत म्हणजे अरबाजचं सॉफ्ट वर्जन”. त्यानंतर दे निक्कीबद्दल देखील भरपूर काही म्हणत होते.

जानवीबद्दल म्हणाले हे वाक्य :

बिग बॉसच्या घरात असताना जानवी आणि पंढरीनाथ यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला होता. तेव्हा जानवीने पंढरीनाथ यांनी त्यांच्या कामगिरीवरून अनेक वादग्रस्त शब्द वापरले होते. तेव्हा पॅडी दादांनी निर्णय घेतला होता की ज्या चित्रपटात किंवा ज्या ठिकाणी जानवी काम करेल तिथे मी काम करणार नाही. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्यांना हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा पॅडी भाऊंनी मनाचा मोठेपणा दाखवत त्यांच्या मनात आता तसं काही नाहीये आणि ते जानवीबरोबर केव्हाही काम करायला तयार आहेत. असं त्यांनी सांगितलं. परंतु जानवीला घराबाहेर आल्यानंतर त्रास सहन करावा लागणार आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य देखील पंढरीनाथ यांनी केलं होतं.

बिग बॉसच्या घराने आत्तापर्यंत प्रत्येक सदस्याला कोणती ना कोणती मोलाची गोष्ट दिली आहे. अशातच नुकताच ग्रँड फिनालेचा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात घरातील सर्व सदस्यांना बिग बॉस मराठी 2 चा विजेता शिव ठाकरे याच्याबरोबर घराबाहेर पडून स्वतःची फॅन फॉलोविंग त्याचबरोबर स्वतःची बिग बॉसच्या घरातील आत्तापर्यंतची जर्नी पाहता येणार आहे. काल झालेल्या भागामध्ये वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी या दोघींनी रेड कार्पेट वरून एंट्री घेतली. ग्रँड फिनालेचा हा भव्य दिव्य कार्यक्रम प्रत्येक वर्षी बिग बॉसच्या घरातच पार पडत असतो परंतु यावेळेस पहिल्यांदाच हा सोहळा बिग बॉसच्या घराबाहेर पार पडणार आहे. अजून उर्वरित सदस्यांची घरातील जर्नी पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi 02 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x