
IRFC Vs BHEL Share Price | सोमवारी भारतीय शेअर बाजारात कमजोरी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स इंडेक्स 400 अंकांच्या घसरणीसह 85,170.52 अंकावर (NSE : IRFC) आला होता. तर निफ्टी इंडेक्स देखील 110.50 अंकांनी घसरून 26,068.45 अंकावर आला होता. अशा काळात शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूक (NSE: BHEL) करण्यासाठी 3 सरकारी शेअर्स निवडले आहेत. यामध्ये IRFC, GAIL आणि BHEL कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. तज्ज्ञांच्या मते हे शेअर्स गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत कमाई करून देऊ शकतात.
IRFC शेअर प्राईस :
हा स्टॉक सध्या आपल्या 200 दिवसाच्या डेली मूव्हिंग एव्हरेजच्या आसपास ट्रेड करत आहे. जर हा स्टॉक 150 रुपये किमतीच्या खाली आला तर शेअर 142-138 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तेजीच्या काळात हा स्टॉक 175 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 2.03 टक्के घसरणीसह 155.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
GAIL शेअर प्राईस :
शेअर बाजारातील तज्ञांनी या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 250-255 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 0.046 टक्के घसरणीसह 240.18 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
BHEL शेअर प्राईस :
शेअर बाजारातील तज्ञांनी या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 300 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 0.071 टक्के वाढीसह 279.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.