20 May 2024 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव खूप महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार
x

Kerala Ayurveda Share Price | पैसा गुणाकारात वाढवायचा आहे? बिग-बुल पोरिंजू वेलियाथ यांनी हा शेअर खरेदी करताच छोटे गुंतवणूकदार सरसावले

Kerala Ayurveda Share Price

Kerala Ayurveda Share Price | पोरिंजू वेलियाथ यांची गुंतवणूक असलेल्या केरला आयुर्वेदा कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. तथापि या स्मॉलकॅप मल्टीबॅगर स्टॉकमध्ये अजूनही तेजी पाहायला मिळत आहे. पोरिंजू वेलियाथ यांना शेअर बाजारातील स्मॉल कॅप स्टॉक्सचा राजा म्हणून ओळखले जाते.

त्यांची गुंतवणूक असलेल्या केरला आयुर्वेदा या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. पोरिंजू वेलियाथ यांनी या स्मॉल कॅप कंपनीमध्ये अधिक गुंतवणूक करून आपले स्टेक 3.18 टक्के वरून वाढवून 4.16 टक्केवर नेले आहे. आज शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी केरला आयुर्वेदा स्टॉक 4.97 टक्के वाढीसह 167.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सेबीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या डेटानुसार, पोरिंजू वेलियाथ यांनी केरला आयुर्वेदा कंपनीचे 103231 शेअर्स 151.87 रुपये किमतीवर खरेदी केले आहेत. यासाठी त्यांनी 1,56,77,691.97 म्हणजेच जवळपास 1.56 कोटी रुपये गुंतवले आहेत. पोरिंजू वेलियाथ यांनी 4 ऑक्टोबर 2023 रोजी केरला आयुर्वेदा स्टॉक खरेदी केला आहे.

शेअर बाजारात ही बातमी पसरल्यानंतर विविध गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली आहे. केरला आयुर्वेदा हा स्मॉल कॅप मल्टीबॅगर स्टॉक 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये 159.85 रुपये इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहोचला होता.

एप्रिल ते जून 2023 या तिमाहीतील केरला आयुर्वेद लिमिटेड कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार पोरिंजू वेलियाथ यांचे नाव कंपनीच्या वैयक्तिक शेअर धारकांच्या यादीत पाहायला मिळत आहे. याचा अर्थ पोरिंजू वेलियाथ यांनी केरला आयुर्वेदा कंपनीचे 1,03,231 नवीन शेअर्स खरेदी केले आहेत.

जून 2023 पर्यंत केरला आयुर्वेद लिमिटेड कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार पोरिंजू वेलियाथ यांच्याकडे केरला आयुर्वेदा कंपनीचे 3,36,000 शेअर्स होते, जे एकूण भाग भांडवलाच्या 3.18 टक्के होते. आता पोरिंजू वेलियाथ यांनी 1,03,231 शेअर्स खरेदी केल्यावर त्यांच्या कडे एकूण 4,39,231 शेअर्स झाले आहे. हे प्रमाण कंपनीच्या एकूण पेड अप कॅपिटलच्या 4.157 टक्के आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kerala Ayurveda Share Price today on 06 October 2023.

हॅशटॅग्स

Kerala Ayurveda Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x