14 November 2019 1:16 PM
अँप डाउनलोड

व्हिडिओ युपी २०१६; रामलीला'मध्ये नवाजुद्दीन मुस्लिम असल्याने शिवसेनेने विरोध केलेला, आज?

मुंबई : सध्या शिवसेनेने अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी निवडणुकीच्या तोंडावर राजकारण सुरु केलं असलं तरी त्यांचा खरा मुखवटा अनेक विषयांवरून समोर येताना दिसत आहे. शिवसेना नेहमीच हिंदुत्वाचा पुरस्कार करते असे सांगत असताना, दुसऱ्या धर्माचा सुद्धा आदर करते असे भाषणात नेहमीच कानावर पडते. शिवसेना केवळ पाकिस्तान आणि बांगलादेश धार्जिण्या मुस्लिमांच्या विरोधात आहे, असं ठासून सांगत असते. परंतु, उत्तर प्रदेशातील मुज्जफरनगर यथे २०१६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रामलीला’मध्ये मारीच’ची भूमिका करणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीला शिवसेनेने केवळ तो मुस्लिम असल्याने रामलीला’मध्ये भूमिका करण्यास तीव्र विरोध केला होता.

विशेष म्हणजे तोच नवाजुद्दीन सिद्दीकी, आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चित्रित होणाऱ्या “ठाकरे” सिनेमात मुख्य भुमीकेत आहे. २०१६ मध्ये स्थानिकांनी आयोजित केलेल्या रामलीला’मध्ये मारिच’च्या भुमीकेत तो अवतरणार होता. परंतु, शिवसैनिकांनी तो मुस्लिम असल्याने त्याला तीव्र विरोध केला होता आणि अखेर मोठा कलाकार असताना सुद्धा रामलीला’मधून त्याला बाहेर करावं लागलं होतं. त्यावर त्यांने माझे स्वप्नं अपूर्ण राहिल्याच ट्विट सुद्धा केलं होतं. नवाजुद्दीन सिद्दीकी मुस्लिम असला तरी तो हिंदूंच्या देवी देवतांचा सुद्धा सन्मान करणारा आहे. त्याने त्याच्या मुलगा एका कार्यक्रमात श्रीकृष्ण बनल्याचा फोटोसुद्धा ट्विट केला होता. वास्तविक कलाकाराला जात नसते हेच त्यातून समोर येत आहे, परंतु शिवसेनेला रामलीला नव्हे तर त्याचा धर्म दिसला होता.

विषय हाच येतो की सध्याच्या शिवसेनेची हिंदुत्व आणि प्रभू श्रीरामाबद्दलची सोयीस्कर भूमिका ही केवळ राजकारणापुरतीच मर्यादित राहिलेली दिसत आहे. स्वतःच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार एखादा धर्म स्वीकारायचा किंवा नाकारायचा असं एकूण चित्र आहे. यातून शिवसेना राम मंदिर आणि धर्माच्या नावे कसं राजकारण करत आहे ते स्पष्ट होतं. उत्तर प्रदेशात ज्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा धर्म पाहून रामलीला मध्ये भूमिका करण्यास अटकाव केला होता, त्याच नवाजुद्दीन सिद्दीकीचा “ठाकरे” या चित्रपटादरम्यान स्वतःच्या सोयीनुसार उदोउदो करताना दिसेल. त्यामुळे अशा बेगडी राजकारणापासून सामान्य लोकांनीच धडा घेणे गरजेचे आहे.

व्हिडिओ: नवाजुद्दीन सिद्दीकी रामलीलाची तयारी करताना;

काय ट्विट केले होते नवाजुद्दीन सिद्दीकीने?

हॅशटॅग्स

#Shivsena(729)#udhav Thakarey(396)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या