15 December 2024 12:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज
x

VIDEO | शिंदे गटातील 16 आमदार निलंबित होण्याची भाजपाला धास्ती असल्याने?, अशोक चव्हाण आणि ऑपरेशन लोटसच संपूर्ण विश्लेषण

Ashok Chavan

Ashok Chavan | मागील काही दिवसांपासून शिंदे गट आणि भाजपमध्ये सुंदोपसुंदी पाहायला मिळत आहे. मंत्र्यांना करण्यात आलेल्या खातेवाटपावरून तर शिंदे गटात नाराजी असून, भाजपच्या मंत्र्यांना सर्वाधिक वजनदार आणि मलाईदार खाती मिळाल्याची चर्चा आहे. तसेच भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे युतीचे मुख्यमंत्री असल्याचं विधान केलं होतं, तर चंद्रकांत पाटलांनीही मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे शिंदे गट आणि फडणवीस सरकारमध्ये सगळेच आलबेल सुरू आहे, असं म्हटल्यास धाडसाचं ठरेल.

त्याच निमित्ताने शिंदे गट आणि भाजपमधील समन्वयासाठी प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष, राजकीय रणनीतीकार आशिष कुलकर्णी यांची भाजपच्या श्रेष्ठींनी मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यामागील वास्तव दुसरं असून मुख्यमंत्री कार्यालयावर नजर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचावर नजर ठेवण्यासाठीच अमित शहा यांनी आशिष कुलकर्णी यांना पुढे केल्याचं वृत्त आहे. सर्वच पक्षात चांगले संबंध असल्याने अमित शहा यांनी आशिष कुलकर्णी यांना राज्यात महत्वाची जवाबदारी देण्यात आल्याचं समजतं.

शिंदे गटातील आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याने भाजपमध्ये सुद्धा धाकधूक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासहित १६ आमदार निलंबित झाल्यात म्हणजे त्यांची आमदारकी रद्द झाल्यास मोठा पेच निर्माण होऊ शकतो. तसेच उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय लागल्यास इतर आमदारांची आमदारकी देखील संकटात येईल. परिणामी सरकार कोसळेल आणि महाविकास आघाडी पुन्हा भक्कम होईल असं अमित शहा आणि मोदींना वाटत आहे. त्यामुळे आधीच आकड्यांचा खेळ सुरु करून आशिष कुलकर्णी यांच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांना जवळ करायचं आणि काँग्रेस आमदारांचा एक गट भाजपमध्ये आणायचा अशी योजना आखली जातं होती. तसेच शिंदे गटाचा केवळ मतांसाठी वापर करून आधीच आकड्यांचा दुसरा पर्याय उभा करायचा अशी भाजपाची रणनीती होते. मात्र माध्यमांवर सगळं षडयंत्र उघड झालं आणि आधीच राज्यात फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपविरोधी वातावरण निर्माण झालेलं असल्याने तूर्त या प्रयोग पुढे ढकलण्यात आल्याचं म्हटलं जातंय. याच पूर्ण विश्लेषण पत्रकार दीपक शर्मा यांनी केलं आहे.

व्हिडिओ पहा :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ashok Chavan under operation Lotus through Ashish Kulkarni check details 03 September 2022.

हॅशटॅग्स

#AshokChavan(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x